New corporators young and educated | Sarkarnama

नवीन पालिका सभागृह तरुण आणि शिक्षितही

उत्तम कुटे :सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 8 मार्च 2017

सर्वांत जास्त तरुण आणि शिक्षित नगरसेवक भाजपचे
 तिशीतील सर्वाधिक नगरसेवकांत महिला अधिक

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या सभागृहातीलनगरसेवकांचे सरासरी वय 46 असून तुलनेने हे तरुण सभागृह आहे.पुन्हा निवडून आलेल्यांचा अपवाद वगळता प्रथमच निवडून आलेले बहुतांश नगरसेवक हे तरुण आहेत. 

सर्वांत लहान वयाच्या नगरसेवकपदाचा मान मान रावेत-किवळे प्रभागातून (16ब) निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खानोलकर यांना मिळाला आहे.त्या अवघ्या 23 वर्षाच्या असून पदवीधरही आहेत.तर,सभागृहातील सर्वांत ज्येष्ठ (वय 63) हा मानही पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या व आता भाजप पुरस्कृत म्हणून पदमजी पेपर मिल प्रभागातून (24 ब) निवडून आलेल्या झामा बारणे यांनी पटकावला आहे. 

दुसरीकडे नव्या नगरसेवकांचे शिक्षणाचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. तर, मतदारांतील वाढती जनजागृती आणि त्याला निवडणूक आयोगाने दिलेली साथ यामुळे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या नगरसेवकांची संख्या सभागृहात खूप कमी झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 सदस्य आहेत. त्यापैकी नव्याने निवडून आलेले बहुतांश तरुण असून त्यातील काहीजण तर अवघ्या तिशीतील आहेत. नव्या सभागृहात वीस टक्के पदवीधर असून चार द्विपदवीधर आहेत. 54 जणांचे शिक्षण दहावीपर्यंत
झालेले आहेत. निगडी-गावठाण प्रभागातील (13) भाजपतर्फे निवडून आलेल्या कमल घोलप या शाळेतच गेलेल्या नाहीत. 
सारिका सस्ते (मोशी -कुदळवाडी 2 ब,भाजप),अपर्णा डोके (चिंचवडगाव 18 ब,राष्ट्रवादी), ऍड. सचिन भोसले (पदमजी पेपर मिल 24 अ,शिवसेना) आणि आशा धायगुडे-शेंडगे (दापोडी-फुगेवाडी 30 ब, भाजप) हे चार नगरसेवक पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.

तिशीतील नगरसेवक

अनुक्रमांक - नाव - प्रभाग - वय - पक्ष
1) कुंदन गायकवाड - चिखली गावठाण 1 अ - 27 - भाजप
2) स्विनल म्हेत्रे- चिखली गावठाण 1 ब - 27 - भाजप
3) सारिका सस्ते - मोशी कुदळवाडी 2 ब - 29 - भाजप
4) वसंत बोराटे - मोशी कुदळवाडी 2 ड - 30 - भाजप
5) सागर गवळी - भोसरी चक्रपाणी वसाहत 5 अ - 29 - भाजप
6) प्रा. सोनाली गव्हाणे - भोसरी गावठाण 7 ब - 30 - भाजप
7) मीनल यादव - .आकुर्डी मोहननगर 14 ब -29 - शिवसेना
8) प्रज्ञा खानोलकर - रावेत किवळे 16 ब ः 23 - राष्ट्रवादी
9) निकिता कदम - पिंपरीगाव - 21 अ - 28 - राष्ट्रवादी
10) अभिषेक बारणे - थेरगाव गावठाण 23 क - 26- भाजप
11) अश्‍विनी वाघमारे - पुनावळे वाकड 25 अ - 30 - शिवसेना
12) ममता गायकवाड - पिंपळे निलख कस्पटे वस्ती 26 अ- 24 - भाजप
13) सागर अंगोळकर - पिंपळे गुरव - 29 अ - 30 - भाजप

* सर्वांत जास्त तरुण आणि शिक्षित नगरसेवक भाजपचे
* तिशीतील सर्वाधिक नगरसेवकांत महिला अधिक
* महापौर पद शर्यतीतील नितीन काळजे यांचे शिक्षण बारावी, केशव घोळवे आणिनामदेव दहावे दहावी,तर संतोष लोंढे यांचे नववी
* विरोधी पक्षनेतेपदाचे दावेदार अजित गव्हाणे यांचे शिक्षण तांत्रिक,योगेश बहल दहावी, तर मंगला कदम नववी
* भाजपचे गटनेते (सत्तारूढ पक्षनेते) एकनाथ पवार यांचेही शिक्षण तांत्रिक
* शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे पदवीधर
* स्थायी समिती अध्यक्षासह महापौरपदाच्या शर्यतीतील शत्रुघ्न ऊर्फ बापू काटे यांचे शिक्षण बारावीपर्यंत

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख