महसूल अधिकाऱ्यांनी प्रामाणिक कामातून स्वतःला सिद्ध करावे :  दौलत देसाई

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आज मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निरोप समारंभ आणि नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्वागत करण्यात आले.
kolhapur-collector
kolhapur-collector

कोल्हापूर: महसूल मधील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. प्रामाणिक काम करूनच स्वतःला सिद्ध करावे आणि या जिल्ह्याचा नावलौकिक करावा असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज येथे केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आज मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निरोप समारंभ  आणि नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री देसाई बोलत होते.

श्री देसाई म्हणाले, महसूल मधील प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने पार पाडावे. अविनाश सुभेदार यांनी कामगारांना एक चांगली दिशा दिली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपण एक काम करू मात्र हे काम करत असताना प्रत्येकाने स्वतःला सिद्ध केले पाहिजे. असे ते म्हणाले.

मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, विचारपूर्वक मी माझा स्वभाव बदलला. कॉलेजमध्ये असताना वेगळा स्वभाव होता. कोणाला आकसाने बोललो नाही किंवा कोणाला डावलल ही नाही.

काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची पिळवणूक करायला आवडतं मात्र आपण असं काहीही न करता चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील, भूमि अभिलेख चे अधिक्षक श्री निकम उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com