मुलाचे नाव ठेवले चक्क 'लाॅकडाऊन'

कोरोनामुळे देशभरात लाॅकडाऊन सुरु आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. अशातच काही गंमतीही घडताहेत. या लाॅकडाऊनच्या काळात जन्मलेल्या एका मुलाचे नांव त्याच्या पालकांनी चक्क लाॅकडाऊनअसेच ठेवले आहे
New Born Baby Named as Lock Down
New Born Baby Named as Lock Down

लखनौ : कोरोनामुळे देशभरात लाॅकडाऊन सुरु आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. अशातच काही गंमतीही घडताहेत. या लाॅकडाऊनच्या काळात जन्मलेल्या एका मुलाचे नांव त्याच्या पालकांनी चक्क 'लाॅकडाऊन' असेच ठेवले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. 

उत्तर प्रदेशातल्या देवरिया या गावात हा मुलगा लाॅकडाऊनच्या काळात जन्मला. त्याच्या पालकांनी त्याचे नामकरण लाॅकडाऊ असेच केले. हे नाव आताच्या काळात हयात असलेल्या सर्वच भारतीयांचा लक्षात राहिल, असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. लाॅकडाऊनच्या काळात या मुलाच्या जन्मानिमित्त करण्यात आलेले सर्व कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात गोरखपूर येथे जन्मलेल्या एका मुलीचे नाव 'कोरोना' ठेवण्यात आले होते. 

या मुलाचे नाव लाॅकडाऊन असे ठेवण्यामागेही त्याच्या पालकांनी विचार केला आहे. स्वहितापेक्षा राष्ट्रीय हित महत्त्वाचे हे या मुलाचे नाव ऐकून लोकांच्या लक्षात राहिल, असा त्याच्या पालकांचा दावा आहे. मुलाच्या पालकांनी काळजी म्हणून आपल्या नातेवाईकांनाही त्याला भेटण्यास मज्ज्वाव केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com