नव्या तेरा मंत्र्यांचा एक - दोन ओळीत परिचय 

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या तेरा मंत्र्यांपैकी तीन डॉक्टर , दोन इंजिनिअर आणि एक वकील आहेत . दोन उद्योजक आहेत तर एक पी. एचडी. पदवीधारक आहेत .
new-ministers
new-ministers

मुंबई : मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या  तेरा मंत्र्यांपैकी तीन डॉक्टर , दोन इंजिनिअर आणि एक वकील आहेत . दोन उद्योजक आहेत तर एक पी एचडी पदवीधारक आहेत . 

1: राधाकृष्ण विखे पाटील ( एम,एस्सी, कृषी ) 

- माजी कृषीमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेता. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. 


2: जयदत्त क्षिरसागर - ( मेकॅनिकल इंजिनिअर)  बीड जिल्ह्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व संघटन कौशल्य. 


3: प्रा.तानाजी सावंत ( इंजिनियर ) - शिक्षण संस्थाचालक. साखर कारखानदार. पहिल्यांदाच विधान परिषदेतूनआमदार. ‘शिवजल क्रांती’ चे प्रणेते. सामुहिक विवाह सोहळ्यातूव शेकडो जोडप्यांचे मोफत विवाह. उध्दव ठाकरेयांचा विश्वासू चेहरा. 


4: आशिष शेलार ( अॅडव्होकेट ) - भाजपातला युवा चेहरा. निष्ठावंत कार्यकर्ता. अभ्यासू मांडणी व पक्षसंघटनात हातखंडा. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून उत्तम यशस्वी कारकिर्द. अमित शहा यांचे विश्वासू म्हणून ओळख. 


5: डाॅ. संजय कुटे ( वैद्यकिय पदवीधर) - बुलढाणा जिल्ह्यातील तरूण नेतृत्व. सलग तीन वेळा विधानसभेत आमदार. विदर्भातल्या प्रश्नांची उत्तम जाणिव व मांडणी. जलसिंचनात काम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेनिकटवर्तीय. 


6: डाॅ. अनिल बोंडे ( वैद्यकिय पदवीधर) - 2014 मधे प्रवेश. मोर्शी ( अमरावती) तून सलग तीन वेळा विधानसभेवर. शेती प्रश्नांची उत्तम जाण. विधानसभेत प्रभावी मांडणी. कुणबी समाजातले नेतृत्व. 


7: डाॅ. सुरेश खाडे ( आयुर्वेदिक पदवीधर) - मिरज मतदार संघातून भाजपचे आमदार. निष्ठावंत मागासवर्गीयचेहरा. उद्योजक. 


8: डाॅ. अशोक उईके ( पीएचडी )- प्राचार्य म्हणून कार्यकिर्द. आदिवासी समाजातील चेहरा. यवतमाळ जिल्ह्यातलेनवे नेतृत्व. पहिल्यांदाच विधानसभेवर 


9: योगेश सागर ( उद्योजक ) - भाजपचे निष्ठावंत. मुंबईतला गुजराती समाजाचा चेहरा. नगरसेवक म्हणून मुंबईमहापालिकेच प्रभावी कामगिरी. आक्रमक चेहरा. 


10: संजय उर्फ बाळा भेगडे - मावळ ( पुणे ) भागातील भाजपचा निष्ठावंत चेहरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय. शेतकरीआंदोलनात सतत सक्रिय. मावळच्या पाणी आंदोलनातून परिचीत नेतृत्व. 


11: परिणय फुके - पहिल्यांदाच विधान परीषदेवर सदस्य. नागपूर मधील तरूण चेहरा. मुख्यमंत्र्यांचे जिवलग मित्र. 


12: अतुल सावे - ( उद्योजक ) औरंगाबाद मधून पहिल्यांदाच विधानसभेत. काॅग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा पराभव केल्याने चर्चेत. माजी शिवसेना खासदार मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव. भाजपमधे वीस वर्षांपासून सक्रिय. व विधानसभेत आमदार. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय. 


13: अविनाश महातेकर - रिपब्लिकन चळवळीतला निष्ठावंत चेहरा. उत्तम वक्ता. अभ्यासू व्यक्तिमत्व. रामदास आठवले यांचे  अत्यंत विश्वासू सहकारी. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com