Never go to government programs, so how can I be upset? : Sanjay Raut | Sarkarnama

सरकारी कार्यक्रमांना कधीच जात नाही, त्यामुळे मी नाराज कसा असेन ? : संजय राऊत 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

मुंबई : येत्या आठ जानेवारी देशभरात पुकारण्यात आलेला देशव्यापी संप हा मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर आहे अशी टीका करतानाच मी नाराज नाही.मुळात कोणत्याही शासकीय कार्यक्रमांना जात नाही असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

मुंबई : येत्या आठ जानेवारी देशभरात पुकारण्यात आलेला देशव्यापी संप हा मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर आहे अशी टीका करतानाच मी नाराज नाही.मुळात कोणत्याही शासकीय कार्यक्रमांना जात नाही असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

ठाकरे सरकारमध्ये संजय राऊत यांचे बंधु सुनील यांना मंत्री न केल्याने ते नाराज असल्याची चर्चा कालपासून सुरू आहे. या चर्चेला पूर्णविराम देताना राऊत म्हणाले,"" मुळात मी नाराज असण्याचे कारण काय ? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोडला तर मी कधीही सरकारी कार्यक्रमांना जात नाही. त्यामुळे मी कालही गेलो नाही. आदित्य यांना मंत्री केले असले तरी पक्षात घराणेशाही नाही. याबाबत उद्धव ठाकरेच उत्तर देतील.'' 

कामगारांच्या संपाबाबत बोलताना ते म्हणाले, की आठ तारखेच्या संपात फक्त संघ नाही . त्यांना सगळंच चांगल सुरू आहे असं वाटते. संपात सहभागी होणाऱ्या सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्री ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

दरम्यान, शिवसेनेचे कामगार नेते सुर्यकांत महाडिक यांनी सांगितले, की देशात मोदीशाहीची धोरणं कामगारांच्या मुळावर उठलीयेत. कामगारांना पगार नाही, खासगीकराणामुळे पिळवणुक होत आहे, तासन तास काम आणि वेतन कमी, मानसिक त्रास जास्त, त्यामुळे रस्त्यावर उतरण्याशिवाय कामगार संघटनांपुढे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख