शिवसेनेच्या विरोधात काम करण्याचे मनातही आले नाही : सुजय विखे

....
sujay vikhe about prakash auti
sujay vikhe about prakash auti

राळेगण सिद्धीः शिवसेनेच्या विरोधात काम करण्याचे कधी मनातही आले नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार औटी यांच्या विरोधात कोठेही काम केलेले नाही. आम्ही एकत्र काम केले असून त्यांचे काही गैरसमज असतील तर चर्चा करून ते दूर करण्याची माझी तयारी आहे, असा खुलासा नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला.

 पारनेर पंचायत समितीत शिवसेनेचा सभापती होण्यासाठी आपण मदत केली. तरीही शिवसेनेच्या कोणी विरोधात काम केल्याचा पुरावा किंवा माहिती मिळाली तर आपण त्यांच्यावर कारवाई करू,असे डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.

पारनेर पंचायत समितीच्या सभापती निवडीनंतर माझ्या पराभवास भाजप जबाबदार आहे, असा आरोप माजी आमदार विजय औटी यांनी केला होता. त्यांचा रोख कोणाकडे होता असा प्रश्न विचारल्यावर विखे यांनी केला.

मौन आंदोलनाच्या 24 व्या दिवशी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत चर्चा केली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्य व देशातून महिला, शाळा महाविद्यालयांतील मुले मुली, नागरिक यांची राळेगण सिद्धीला रोज गर्दी होत आहे.

काल खासदार डॉ. विखे यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे, सुभाष दुधाडे, उपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, सुनिल हजारे, डॉ. गणेश पोटे, संदिप पठारे, शरद मापारी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान अण्णांनी मांडलेले प्रश्न हे समाजहिताचे असून त्यासाठी आपण लोकसभेत आवाज उठवू तसेच वेळोवेळी पंतप्रधानांशी चर्चा करू, असे आश्वासन खासदार डॉ.विखे यांनी दिले होते. प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर खासदार डॉ. विखे यांनी अण्णांचे आंदोलन सुरू झाल्यावर तेविसाव्या दिवशी भेट दिली.

निवडून आल्यानंतर आपणास या आश्वासनाचा विसर पडला का, असा विचारला असता, "कामाचा व्याप, संघटनेतील जबाबदारी यामुळे मला उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. निर्भयाच्या गुन्हेगारांना येत्या 22 जानेवारी रोजी फाशी देण्याचा निकाल न्यायालयाने दिला असून अण्णांच्या महिला अत्याचारा विरोधात कठोर कायद्याची मागणी व इतर मागण्यांबाबत आपण वरिष्ठ पातळीवर भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याशी आपण संपर्क साधला असून ते केंद्राशी चर्चा करून याप्रश्नी तोडगा काढणार आहेत, " असे डॉ. विखे यांनी सांगीतले. भाजपसारख्या पक्षात काम करताना काही मर्यादा सांभाळून मला काम करावे लागते, अशी कबुलीही त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com