विनोद तावडेंना नेटिझन्सचा चिमटा, आता मॅनेजमेंट कोट्यातून उमेदवारी मिळवा

मंत्री महोदयआता थेट मॅनेजमेंट कोट्यातूनच उमेदवारी मिळवा असा शालजोडीतलाटोलाही मारला आहे .
Vinod_Tawde
Vinod_Tawde

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजपच्या उमेदवारांच्या यादीत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नाव प्रसिद्ध झाले नाही.

विद्यार्थ्यांचे नाव यादीत न आल्याचे दु:ख आज शिक्षणमंत्र्याना समजले असेल, चार याद्या प्रसिद्ध होऊन यादीत नाव न आल्यानंतर होणारा मानसिक त्रास आता शिक्षणमंत्री तावडेंना कळला असेल, अशा शब्दांत नेटकरी मंडळींनी तावडेंच्या जखमेवर मीठ चोळले .  विद्यार्थ्यांनी, मंत्री महोदय आता थेट मॅनेजमेंट कोट्यातूनच उमेदवारी मिळवा असा   शालजोडीतला  टोलाही मारला आहे . 
तर काहींनी उमेदवारी मिळविण्यात शिक्षणमंत्री नापास अशा कॉमेंट्सही केल्या आहेत . 

शिक्षण मंत्री असलेल्या पदवीवरून निर्माण झालेले वादळ, शालेय शिक्षण विभागातील कार्यपद्धतीवर असलेली नाराजी, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांकडून होणारी दिरंगाई यासारखी अनेक कारणे विनोद तावडेंना तिकीट नाकारण्यामागे असल्याची दबकी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. 

महाविद्यालयीन प्रवेशादरम्यान, चौथ्या यादीत नाव आले नसले तर विद्यार्थ्यांना कसे वाटत असेल असे म्हणत सोशल मिडियावर तावडेंवर तोंडसुख घेतले जात आहे.

शालेय शिक्षण मंत्रालयाची धुरा हाती घेतल्यापासून तावडे यांच्या कारभारावर विद्यार्थी नाराज होते. प्रवेश प्रक्रियेतील दिरंगाई आणि एकूणच पद्धतीवरुन विद्यार्थी संताप सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. विद्यार्थी पालकांच्या वारंवारच्या नाराजीमुळे विनोद तावडेंची उचलबांगडी करत आशिष शेलारांकडे शालेय शिक्षण मंत्रालय सोपविण्यात आले होते.

भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे तावडे आधीपासूनच प्रतिक्षा यादीत होते. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनंतर त्यांचा पत्ता कट झाल्याचे जवळपास स्पष्टच झाले होते. चौथ्या आणि भाजपच्या शेवटच्या यादीतही स्थान न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरुन तावडेंना चांगलेच ट्रोल केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com