nephew of sanjaymama shinde defeats in zp election | Sarkarnama

संजयमामांच्या पुतण्याचा सभापती निवडीत पराभव

तात्या लांडगे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

....

सोलापूर: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मंगळवारी (ता. 14) समाजकल्याण, महिला बालकल्याण, अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन या समित्यांसाठी निवडी पार पडल्या. त्यामध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार संजय शिंदे यांचे पुतणे रणजितसिंह शिंदे यांचा सभापती निवडीत तीन मतांनी पराभव झाला. विजयराज डोंगरे व अनिल मोटे यांनाही संधी मिळाली मात्र, त्यांना कोणत्या समित्या मिळणार हे अद्याप अस्पष्टच आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी सभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. 11) उशिरापर्यंत समविचारी आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली होती. त्यानुसार रणजितसिंह शिंदे यांना सभापतीपद मिळेल असा विश्‍वास होता. मात्र, त्यांच्या पराभवाने राष्ट्रवादी आघाडीला धक्‍का बसला.

राष्ट्रवादी आघाडीकडून अनिल मोटे व रणजितसिंह शिंदे यांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये मोटे यांचा विजय तर शिंदे यांचा पराभव झाला. आता कोणत्या तीन सदस्यांनी शिंदे यांना मतदान केले नाही, याचा शोध सुरु झाला आहे.

जिल्हा परिषदेचे नवे सभापती
- संगिता धांडोरे : (राष्ट्रवादी आघाडी) : समाजकल्याण सभापती
- स्वाती शटगार : (कॉंग्रेस) : महिला बालकल्याण
- विजयराज डोंगरे (समविचारी आघाडी) : सर्वसाधारण समिती
- अनिल मोटे : (राष्ट्रवादी आघाडी) : सर्वसाधारण समित्या
-
ठळक बाबी...
- संगिता मोटे (भाजप) 31 आणि स्वाती शटगार यांना 35 मते मिळाली
- राष्ट्रवादी आघाडीचे रणजितसिंह शिंदे यांना 32 मते मिळाली मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला
- शहाजी पाटील गटाचे अतुल पवार यांचा तीन मतांनी झाला पराभव
- जिल्हा परिषदेच्या 35 सदस्यांनी बजावला मतदानाचा अधिकार
- भाजपचे सदस्य गोपाळ अंकुशराव यांनी पोलिस बंदोबस्तात केले मतदान
-
चिठ्ठीने सुभाष मानेंची संधी हुकली
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत सुभाष माने व संगिता धांडोरे यांना प्रत्येकी 33 मते मिळाली. त्यानंतर चिठ्ठी काढली आणि त्यामध्ये संगिता धांडोरे यांना संधी मिळाली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख