राष्ट्रवादी कॉंंग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्‍यात 

राष्ट्रवादी कॉंंग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्‍यात 

मुंबई : लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत झालेला पराभव आणि निवडणुक आयोगाच्या नियमानुसार पुरेशी मते मिळाली नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेली मान्यता धोक्‍यात आली आहे. 
शरद पवार यांनी 1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली होती. त्याच सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस मतदान झाले होते. राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत आघाडी करून केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन केली होती.

2004 आणि 2009 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाने स्वतःचे अस्तित्व कायम राखले होते. प्रत्येक वेळी आठ किंवा नउ खासदार आणि अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार निवडून आल्याने पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली होती. मात्र 2014 आणि 2019 सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची जोरदार पिछेहाट झाली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कायद्यातील तरतुदीनुसार पक्षाला मतांचा टक्‍का राखता आला नाही.

या पार्श्‍वभूमीवर तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला बजावली आहे. तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही अशीच नोटीस पाठवण्यात आली आहे. राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी लोकसभेच्या चार जागा जिंकण्यासह चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मते पक्षाला मिळणे आवश्‍यक असते. परंतू राष्ट्रवादी कॉंग्रेसला हि मते राखता आलेली नाहीत. 

सध्या भारतात भाजप, कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे आठ राष्ट्रीय दर्ज असलेले पक्ष आहेत. राष्ट्रवादी, तृणमूल आणि भाकपचा दर्जा काढून घेतल्यास पाचच राष्ट्रीय पक्ष देशात उरतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com