हर्षवर्धन यांना राष्ट्रवादीचा झटका; पण त्याचा अतुल बेनकेंना फटका

हर्षवर्धन यांना राष्ट्रवादीचा झटका; पण त्याचा अतुल बेनकेंना फटका

जुन्नर : काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील कुरघोडींचा फटका कोणाला कधी बसेल, याचा नेम नाही. यात कोणाला फायदा तर कोणाला तोटा होत असल्याचे दिसून येत आहे. काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघ न सोडण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्धाराचा फटका राष्ट्रवादीचे जुन्नरमधील इच्छुक उमेदवार अतुल बेनके यांना बसण्याची चिन्हे आहेत.

पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि जुन्नर तीन जागा काॅंग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने दर्शवली आहे. त्यात भोरची जागा आधीपासूनच काॅंग्रेसकडे आहे. उर्वरित दोन जागांचा फायदा काॅंग्रेसला पुणे जिल्ह्यात होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार नसलेल्या दोन जागा काॅंग्रेसकडे देण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहमती दर्शवल्याने तेथील इच्छुक मात्र बुचकळ्यात पडले आहेत.

जुन्नरमध्ये काॅंग्रेसडून सत्यशील शेरकर हेच प्रबळ इच्छुक आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने जागा सोडणे, हे गुड न्यूज ठरली आहे. ``लोकसभा निवडणुकीत काँगेस ज्या ताकदीने राष्ट्रवादी काँगेसबरोबर राहिली त्याच ताकदीने विधानसभेला राष्ट्रवादी काँगेस काँगेसचे काम करून आघाडीचा धर्म पाळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यात तालुका काँग्रेसचा मोठा वाटा उचलला आहे. यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसला उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी काँगेसदेखील आघाडीच्या धर्माचे पालन करेन यात शंका नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

जुन्नरसह जिल्ह्यातील तीन मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या जागा वाटपात कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याच्या बातमीने तालुका काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. पक्षश्रेष्ठींना मुलाखत देखील दिली आहे. हा मतदारसंघ   काँग्रेसला मिळाल्यास निवडणूक लढविण्याची शंभर टक्के तयारी असल्याचे शेरकर यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढली जाणार असून मला उमेदवारी मिळाली तर  सत्यशील शेरकर यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल करू असे सांगितले होते. त्याप्रमाणे मला उमेदवारी मिळाली तर अतुल बेनके माझ्या सोबत अर्ज दाखल करण्यासाठी असतील, अशीही आशा शेरकरांनी व्यक्त केली.

माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्यानंतर शेरकर कुटुंबाने राजकारणात तटस्थ भूमिका घेतली. स्व. सोपानशेठ शेरकर यांच्यानंतर विघ्नहर साखर कारखान्याची धुरा सत्यशील शेरकर यांचेकडे आली. तरुण वयात ती समर्थपणे पेलवत तालुका काँगेसला संजीवनी दिली तसेच युवा संघटन वाढवले असल्याने शेरकर यांच्या उमेदवारीचे काॅंग्रेसकडून स्वागतच होईल, असे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com