नरेंद्र - देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र : 'राष्ट्रवादी युवक'ची घोषणा  - NCP Youth wing give slogans against Narendra Modi & Devendta Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र - देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र : 'राष्ट्रवादी युवक'ची घोषणा 

सरकारनामा
बुधवार, 19 जून 2019

.

पुणे : 'नरेंद्र - देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र' च्या घोषणांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रसेने पुण्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक केंद्र दणाणून सोडले. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोजगार केंद्राला टाळे ठोकले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आणि सुरज चव्हाण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 

 

 

'गाजर नको - रोजगार हवा, नरेंद्र - देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, सांगा रोजगार देणार कधी?,' या सरकारचं करायच काय? खाली डोक अन्‌ वर पाय' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रोजगार कार्यालयाचा परिसर दुपारी दणाणून सोडला होता. 

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली असल्याची टीका त्यांनी केली. 

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख