आमदार भरणे यांंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध : अप्पा जगदाळेंचे शक्तिप्रदर्शन

आमदार भरणे यांंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध : अप्पा जगदाळेंचे शक्तिप्रदर्शन

इंदापूर : इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना आगामी विधानसभेचे तिकीट देण्यास पक्षाचे तालुका नेते व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. सराटी ( ता. इंदापूर ) येथील जिजामाता विद्यालय प्रांगणात आज (ता.18) झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी करण्यात आली.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा संदेश यामुळे गेला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये बंडखोरीची भाषा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही मागणी करण्यात आली.  जेष्ठ नेते अशोक घोगरे, भाऊसाहेब सपकळ, प्रभाकर खाडे यांनी  हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही मागणी करण्यात आली. इंदापूर तालुक्याचा `ढाण्या वाघ` म्हणून आप्पासाहेब जगदाळे याना आमदारकीचे तिकीट देण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

या मेळाव्यात भरणे यांनी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. ज्या ग्रामपंचायतींना 2 कोटी रुपयांचा निधी आमदार भरणे यांनी दिला मात्र त्या ग्रामपंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकला नाही. जुन्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप सर्वांनी केला. यावेळी `एक नेता, एकच पद` हवे अशी मागणी करण्यात आली.

इंदापूरमधून आमदारकीसाठी राष्ट्रवादीतून सातजण इच्छुक आहेत. मात्र अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा निर्णय सर्वांनी मान्य करण्याचे ठरले. मेळावा सुरू असून या मेळाव्यास आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने उशिरापर्यंत उपस्थित झाले नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com