अजित पवारांना साकडे....दादा, आम्ही आमदार दिला, आता निफाड कारखाना सुरु करा हो!

येथील निफाड सहकारी साखर कारखाना एकेकाळचा महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा कारखान होता. मात्र नियोजनशुन्य कामकाजाने तो बंद आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पावारांना त्यांच्या आश्‍वासनाची आठवण करुन दिली. "आम्ही तुम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार दिला. आता आमचा निफाड कारखाना सुरु करा हो'' असे साकडे घातले
NCP Workers Request Ajit Pawar to Start Niphad Sugar Factory
NCP Workers Request Ajit Pawar to Start Niphad Sugar Factory

निफाड  : येथील निफाड सहकारी साखर कारखाना एकेकाळचा महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा कारखान होता. मात्र नियोजनशुन्य कामकाजाने तो बंद आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पावारांना त्यांच्या आश्‍वासनाची आठवण करुन दिली. "आम्ही तुम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार दिला. आता आमचा निफाड कारखाना सुरु करा हो'' असे साकडे घातले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी निफाड सहकारी साखर कारखाना, रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची प्रचारसभांमधून गर्जना केली होती. याच कालावधीत निफाडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "तुम्ही मला निफाडला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार द्या, मी तुमचा साखर कारखाना सुरू करतो,'' असे सांगितले होते. त्याप्रमाणे निफाडच्या मतदारांनी दिलीप बनकर यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार दिला आहे. आता "दादा, तुम्ही आमचा निसाका सुरू करा.'' अशी मागणी निवेदनाद्वारे शिंगवे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी भूषण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

तालुक्‍याचे मानदंड असणारा निफाड साखर कारखाना, रानवड आणि खासगी केजीएस शुगर हे कारखाने बंद असल्याने निफाडच्या ऊस उत्पादकांची परवड झाली आहे. यासंदर्भात निवडणूक काळात शिवस्वराज्य यात्रेदरम्यान 'निसाका'संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कारखाना सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. यामुळे "दादा आमचा निसाका सुरू करा हो.'' अशी अर्त मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भूषण शिंदे आणि कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. काही वर्षांपासून निफाड सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आपल्या शब्दाला कसे जागतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

निफाड सहकारी साखर कारखाना हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आता महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे निश्‍चितच 'निसाका'चा विषय मार्गी लागू शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नातून हे शक्‍य असल्याने तसेच निफाडकरांना आव्हान केल्यानुसार आम्ही राष्ट्रवादीचे आमदार दिला आहे म्हणून त्यांना निवेदन दिले - भूषण शिंदे, शिंगवे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com