संकटाच्या काळात उदयनराजेंनी जावू नये, ही कार्यकर्त्यांची इच्छा!

मात्र शरद पवार यांचे उदयनराजे यांच्यावर प्रेम आहे. तसेच उदयनराजे यांच्याही मनात शरद पवार यांच्याबद्दल प्रेम व आदर आहे.
संकटाच्या काळात उदयनराजेंनी जावू नये, ही कार्यकर्त्यांची इच्छा!

कऱ्हाड (सातारा): ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सद्या संकटाचा प्रसंग आहे. यापरिस्थितीत उदयनराजे भोसले यांनी थांबावे, ही सर्वसामन्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे,'' असे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असलेल्या प्रश्‍नाबाबत खासदार कोल्हे म्हणाले, भाजपच्या वाटेवर असण्याची चर्चा आहे. मात्र शरद पवार यांचे उदयनराजे यांच्यावर प्रेम आहे. तसेच उदयनराजे यांच्याही मनात शरद पवार यांच्याबद्दल प्रेम व आदर आहे. संकटाच्या प्रसंगात त्यांनी थांबावे, अशी सर्वसामन्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना तशी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे ते तसा निर्णय घेतील, अशी आशा आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com