पार्थच्या पराभवाने सुप्रियांच्या विजयाचा जल्लोष बारामतीत नाही...

पार्थच्या पराभवाने सुप्रियांच्या विजयाचा जल्लोष बारामतीत नाही...

सोमेश्वरनगर : देशभर चाललेली मोदी सुनामी बारामती लोकसभा मतदारसंघाने मात्र निष्प्रभ ठरवली. खडकवासला आणि थोडाफार दौंड वगळता अन्य तालुक्यांनी सुप्रिया सुळे यांनाच भरभरून मतदान दिले. मागील वेळी सुळे यांना तारणाऱ्या बारामती तालुक्याने याहीवेळी सर्वाधिक मताधिक्य दिले.

या प्रचंड विजयानंतरही पक्षाचा आणि पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने ग्रामीण कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला नाही.

भाजपाच्या लाटेतही बारामतीने पन्नास वर्षांची परंपरा कायम ठेवत पवार कुटुंबियांवरच विश्वास प्रकट केला. आज सकाळी मतदान सुरू झाले तेव्हा पहिल्या फेरीत सुळे कांचन कुल यांच्यापेक्षा पाच हजार मतांनी मागे पडल्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काळजाची धडधड वाढली होती.

मागील निवडणुकीप्रमाणे यावेळी पवार कुटुंबीय गहाळ राहिले नव्हते. निवडणूक गांभीर्याने घेऊन प्रत्येक गावात, प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे भाजपाकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन टार्गेट केले होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर ठिय्याच मारला होता. उलट सुळे यांचे मताधिक्य दुप्पट झाले.


यावेळीदेखील बारामती तालुक्याने लाखापेक्षा जास्त मताधिक्य देऊन सुळे यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. दुसरीकडे कांचन कुल यांना त्यांच्या तालुक्याने अत्यल्प आघाडी दिली. इंदापूर तालुका प्रचंड जोमाने सुळे यांच्या मागे उभा राहिला. मागील वेळी दुरावलेला पुरंदरही यावेळी मदतीस धावला. भोर तालुक्यानेही 19 हजारांचे मताधिक्य दिल्याने सुळे यांचा मोठा विजय सुकर झाला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com