ncp women wing files complaint against ram kadam | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राम कदम यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसची विनयभंगाची तक्रार

ज्ञानेश सावंत
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

पुणे : ""राम कदम, तुम्ही विधीमंडळात ज्या पध्दतीने विषयांची मांडणी करता, त्यावर बोलता, त्यामुळे तुमचे कौतुक व्हायचे. पण, तुम्ही मुलींना पळवून देण्याची भाषा करीत, आपली वैचारिक दिवाळीखोरी मांडलात. त्याबद्दल तुम्ही आता माफी आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसने केली आहे.

पुणे : ""राम कदम, तुम्ही विधीमंडळात ज्या पध्दतीने विषयांची मांडणी करता, त्यावर बोलता, त्यामुळे तुमचे कौतुक व्हायचे. पण, तुम्ही मुलींना पळवून देण्याची भाषा करीत, आपली वैचारिक दिवाळीखोरी मांडलात. त्याबद्दल तुम्ही आता माफी आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसने केली आहे.

राम कदम तुमच्या अशा वक्तव्याने महाराष्ट्रातील पालक भयभीत झाला आहे. आमच्या मुलींना पळवून नेणाऱ्यांना तुम्ही साथ देणार आहात का, अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने कदम यांना विचारले आहेत.
 
कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करीत, त्यांच्याविरोधात आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कदम यांच्याविरोधात सह्यांची मोहीम घेण्याचे नियोजनही चाकणकर यांनी केले आहे.
 
"एखादी मुलगी आवडली असेल तर सांगा मी तिला पळवून आणेल,' असे विधान कदम यांनी दहीहंडीनिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात केले. त्याचे पडसाद राज्यभर उमटले असून, सर्वच स्तरातून त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या राजकीय विरोधकांसह संस्था-संघटनांच्या निशाणावर कदम आले आहेत.

पुणे शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने तर कदमांसाठी खास प्रश्‍नावली तयार केली आहे. ती कदम यांना पाठवून देत, प्रश्‍नांची उत्तरे मागविली आहेत. "मी कोण्या एका कुटुंबाची नव्हे तर संबंध महाराष्ट्राची लेक म्हणून त्यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. कदमांना विचारलेल्या भावनिक आणि खोचक प्रश्‍नांची चर्चा सध्या सोशल मीडिया जोरात सुरू आहे. या मोहिमेत महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन चाकणकर यांनी केले आहे. 

चाकणकर म्हणतात, ""आधीच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न असतानाच कदम यांच्या वक्तव्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी आता प्रत्येक घरातील महिला पुढे येतील. कदम यांच्यामुळे समाजातील अपप्रवृत्तीळा बळ मिळेल. ज्यामुळे मुलांना घराबाहेर पडणेही शक्‍य होणार नाही. महिलावर्गची अहवेलना होऊनही शिस्तीचा भाजप मात्र, शांत आहे. कदमांवरील कारवाईचे धाडस का करीत नाही. या सरकारमधील मंत्री महिलांविरोधी भूमिका घेतात, सार्वजनिक ठिकाणी ती मांडतात. तरीही भाजप नेते गप्प का? '' 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख