ncp woman wing agitation near matoshree | Sarkarnama

राष्ट्रवादी महिला आघाडीचे मातोश्रीबाहेर आंदोलन 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर मुंबई राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने आज जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. 

मुंबई राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी त्यांना नी कॅप आणि प्रतिकात्मक वाघ भेट देवून निषेध केला. 

शरद पवार हे संपूर्ण देशाचे नेते असून त्यांच्याबद्दल असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी पेडणेकर यांनी केली. 
उद्धव ठाकरे यांचा गुडघ्यातील मेंदू शाबूत रहावा यासाठी आम्ही त्यांना नी कॅप तर शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले आहे. तो वाघ पुन्हा शाबूत रहावा म्हणून प्रतिकात्मक वाघ भेट दिल्याची माहिती नलावडे यांनी दिली. 

या आंदोलनात उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षा बिलकिश आपा, सुरेना मल्होत्रा, डॉ. रिना मोकल, अनिता थोरात, स्वाती माने, युवक तालुकाध्यक्ष राकेश धिलोड आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख