NCP Wins Nashik Panchayat Samiti Chairman Post | Sarkarnama

राष्ट्रवादीने मारली बाजी, नाशिक पंचायत सभापतीपदी विजया कांडेकर बिनविरोध

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

नाशिक पंचायत समिती सभापतींच्या आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेला उमेदवारही मिळू शकला नाही. सभापतीपदी विजया कांडेकर तर उपसभापतीपदी ढवळू फसाळे यांची बिनविरोध निवड झाली

नाशिक : नाशिक पंचायत समिती सभापतींच्या आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेला उमेदवारही मिळू शकला नाही. सभापतीपदी विजया कांडेकर तर उपसभापतीपदी ढवळू फसाळे यांची बिनविरोध निवड झाली.

नाशिक पंचायत समितीसह तालुक्‍याच्या सत्तेच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सातत्याने तीव्र संघर्ष असतो. पंचायत समितीच्या आठ सदस्यांत राष्ट्रवादीचे पाच, शिवसेनेचे दोन तर एक अपक्ष सदस्य आहे. राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडीचे वारे वाहते आहे. त्यामुळे शिवसेनेला किमान एखादे पद मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी शेवटपर्यंत सदस्य व नेते एकमेकांशी संपर्क करीत होते. 

याबाबत चर्चेचा प्रस्तावही आला होता. मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शिवसेना सदस्यांचा गोंधळ झाला. ते उमेदवारी अर्जही दाखल करु शकले नाहीत. यामध्ये सभापती व उपसभापती दोघेही बिनविरोध निवडून आले. यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर,  संपत सकाळे, दिलीप थेटे, सचिन पिंगळे, विष्णुपंत म्हैसधुने, सचिन टिळे आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख