kokate-meets-sharad-pawar
kokate-meets-sharad-pawar

श्रीमंत कोकाटेंना राष्ट्रवादीत लवकरच महत्त्वाची जबाबदारी

अमोल मेटकरी यांच्यापाठोपाठ कोकाटे यांनाही पदाचे वेध

बारामती : राज्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितेही वेगाने बदलू लागली आहेत. संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली.

श्रीमंत कोकाटे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच त्यांच्यावरही एक महत्वाची जबाबदारी शरद पवार सोपविणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. या प्रसंगी कोकाटे यांच्या समवेत प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे आदी उपस्थित होते. 

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेटही अशीच प्रवीण गायकवाड, किरण गुजर, प्रफुल्ल तावरे आदींनी शरद पवार यांच्याशी घडवून आणली होती. त्या नंतर वेगाने चक्रे फिरली आणि डॉ. कोल्हे यांना थेट राष्ट्रवादीने खासदारकीची संधी दिली. राष्ट्रवादीमधून आउटगोईंग सुरु असताना अमोल मिटकरी व अमोल कोल्हे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रचारादरम्यानच्या भाषणांना मिळालेल्या प्रतिसादाचा फायदा राष्ट्रवादीला थेट झाला होता. 

श्रीमंत कोकाटे यांची शरद पवार यांच्याशी आज भेच  झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. कोकाटे यांना राष्ट्रवादीच्या थिंक टँकमध्ये महत्वाची जबाबदारी सोपविण्याचा विचार सुरु असून त्यांच्यावर काही महत्वाची कामगिरी सोपविण्याबाबतही तयारी सुरु असल्याचे आज समजले. श्रीमंत कोकाटे यांच्या प्रभावी वक्तृत्वाचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित होणार असल्याने त्यांना पक्षात सामावून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com