ncp will face big disappointment in baramati : kul | Sarkarnama

बारामतीत राष्ट्रवादीचा मोठा अपेक्षाभंग होणार : राहुल कुल

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 16 मे 2019

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचा अपेक्षाभंग होणार असून, येथील जनतेने भाजपला प्रचारादरम्यान प्रचंड प्रतिसाद दिला. येथील जनता राष्ट्रवादीच्या नेत्यांची `गंमत` करणार असून कमळाचा विजय निश्चित आहे, असा विश्वास दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.

राहुल यांच्या पत्नी कांचन यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी लढत दिली. ही लढत देशात गाजली. बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यास इव्हीएमच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याने या लढतीबाबत मतदानानंतरही पुन्हा चर्चा सुरू झाली.

याबाबत `सरकारनामा`शी बोलताना राहुल कुल म्हणाले की राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दुसरे नेते अजित पवार यांनी इव्हीएमवर शंका घेणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आता राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी इव्हीएमबद्दल का शंका व्यक्त केली, याची मला कल्पना नाही. या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतो, याची जाणीव झाल्यामुळेच तशी शंका व्यक्त होत असावी.

आम्ही या मतदारसंघात चांगली लढत दिली, याचे समाधान महत्त्वाचे आहे. भाजप आणि शिवसेनेचे सर्व नेते एकदिलाने काम करत होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. माझी पत्नी ही थेट पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला उभी होती. कुल कुटुंबियाबद्दल असलेली आस्था आम्हाला या निवडणुकीत दिसून आली, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विजयाचे गणित हे केवळ बारामती विधानसभा मतदारसंघात मिळणाऱ्या लिडवर अवलंबून आहे. मात्र बारामती तालुक्यातच राष्ट्रवादीचा अपेक्षाभंग होणार आहे. इतर पाचही विधानसभा मतदारसंघात आम्ही ताकदीने उतरलो होतो. त्यामुळे तेथेही भाजपलाच मताधिक्य मिळणार आहे. माझ्या दौंड तालुक्यात तर आम्ही चांगले मताधिक्य घेऊ. येथील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे दौंडमध्ये राष्ट्रवादीलाच लीड मिळणार असल्याची भाषा करतात. पण मतमोजणीच्या दिवशी भाजपलाच दौंडमधून राष्ट्रवादीपेक्षा अधिक मते मिळतील, याबाबत खात्री आहे, असे कुल यांनी सांगितले.

पुरंदरमध्ये राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी चांगली साथ दिली. खडकवासल्यात आम्ही सर्वाधिक आघाडी घेऊन राष्ट्रवादीला त्याआधारे चितपट करू. भोर आणि इंदापूरमध्येही राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या जनतेने भाजपला साथ दिली आहे, असा दावा कुल यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख