नागपुरात राष्ट्रवादीचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला; शहरात व ग्रामीणमध्ये प्रत्येकी तीन जागांची मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये तीन अशा सहा जागांची मागणी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे. मतदारसंघासोबत इच्छुकांची नावेही त्यांना देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीची ताकद बघता कॉंग्रेसच्या वा
नागपुरात राष्ट्रवादीचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला; शहरात व ग्रामीणमध्ये प्रत्येकी तीन जागांची मागणी

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये तीन अशा सहा जागांची मागणी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे. मतदारसंघासोबत इच्छुकांची नावेही त्यांना देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीची ताकद बघता कॉंग्रेसच्या वाटाघाटीत राष्ट्रवादीला किती जागा मिळतात, हे बघणे औत्सुक्‍याचे राहील.

आघाडी असली तरी नागपूर शहरात आजवर राष्ट्रवादीसाठी एकही जागा कॉंग्रेसने सोडली नाही. अशोक धवड अध्यक्ष असताना त्यांनी एका जागेचा आग्रह धरला होता. तोसुद्धा मान्य केला जात नसल्याचे बघून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. मागील निवडणुकीत आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला पाच हजाराच्यावर मते मिळाली नाहीत. विशेष म्हणजे दोनवेळा कॉंग्रेसचे आमदार राहिलेल्या दीनानाथ पडोळे यांचाही यात समावेश होता. राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या होत्या.

जिल्ह्यात अनिल देशमुख आणि त्यानंतर रमेश बंग यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिवंत ठेवली. देशमुखांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला. रमेश बंग हिंगण्यातून एकदा आमदार झाले. यावेळी त्यांची कॉंग्रेससोबत आघाडी होती. मात्र, आघाडी तुटताच दोघांचाही पराभव झाला. कामठी आणि उमरेड मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार सातत्याने पराभूत होत आहेत. त्यामुळे यांपैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची आग्रही मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. त्याशिवाय राष्ट्रवादीची  ताकद वाढणार नाही, असाही तर्क देण्यात आला. येथून जिल्हाध्यक्ष बाबा गुजर लढण्यास इच्छुक आहेत. बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

शहरातील पूर्व नागपूरमधून एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, मध्यमधून शहराध्यक्ष अनिल अहीरकर, दक्षिणमधून ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, माजी नगरसेवक राजू नागुलवार, प्रवीण कुंटे, पश्‍चिममधून सलील देशमुख, शैलेंद्र पांडे, दक्षिण-पश्‍चिममधून देवीदास घोडे, दिलीप पनकुले, धनराज फुसे, उत्तरमधून विशाल खांडेकर यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com