ncp tries for yavatmal loksabha constituency | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

यवतमाळ मतदारसंघ मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न; माणिकरावांसाठी धोक्याची घंटा 

सुरेश भुसारी
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

नागपूर : दोन्ही काॅंग्रेसच्या जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हवा आहे. कॉंग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला ढासळला असून आता यात राष्ट्रवादीचे घड्याळ टिकटिक करेल, असा दावा केला जात आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणे सुरू केले आहे. यात विदर्भातील बुलडाणा व भंडारा-गोंदियासह यवतमाळ हा तिसरा मतदारसंघ घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यवतमाळ मतदारसंघ हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या निधनानंतर या किल्ल्याचे बुरुज ढासळू लागले. 

आज सात विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात कॉंग्रेसला विजय मिळू शकला नाही. सध्या पुसदमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर नाईक यांनी आपली गढी राखली आहे. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघात बंजारा समाजाची व्होट बॅंक प्रभावी आहे. या व्होट बॅंकेवर नाईक घराण्याचा प्रभाव आहे. यामुळे मनोहर नाईक यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून किल्ला सर करायचा, अशी खेळी खेळली जाणार आहे. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत. 

वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) व वाशिम विधानसभा मतदारसंघांचा समावेश यवतमाळ लोकसभा मतदारसंघात होतो. नाईक फॅक्‍टर व वाशिम जिल्ह्यातील सुभाष ठाकरे यांच्या भरवशावर राष्ट्रवादीचा मतदारसंघ सर करण्याच्या प्रयत्न करीत आहे. या मतदारसंघावर कॉंग्रेसही सहजासहजी पाणी सोडेल, असे वाटत नाही. माजी आमदार माणिकराव ठाकरे यांनी जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. ठाकरेंचा बिमोड करणे राष्ट्रवादीला फारसे जड जाणार नसले तरी पुसद व वाशिम हे मतदारसंघ सोडल्यास राष्ट्रवादीला यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात बुथ कार्यकर्त्यांची जमवाजमव त्वरित करावी लागेल.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख