राष्ट्रवादीचे 'एक बुथ दहा युथ' अभियान..! - NCP takes drive for one booth ten youth across Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे 'एक बुथ दहा युथ' अभियान..!

संजय मिस्कीन :  सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 10 मे 2018

आगामी तीन महिन्यात 'एक बुथ दहा युथ' असे अभियान राष्ट्रवादीने हाती घेतले आहे. आज याबाबतची बैठक पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली.

मुंबई : राज्यभरात युवकांची ताकद उभी राहिली तरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सगळयात मोठा पक्ष म्हणून होवू शकतो. असा विश्‍वास व्यक्‍त करत आगामी तीन महिन्यात 'एक बुथ दहा युथ' असे अभियान राष्ट्रवादीने हाती घेतले आहे. आज याबाबतची बैठक पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली.

आगामी निवडणूकां वर्षभरावर येवून ठेपलेल्या असताना राष्ट्रवादीने कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी म्हणून युवकांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचा भर जयंत पाटील यांनी दिला आहे. 

राज्यातील 91 हजार 400 बुथ व दहा सक्रिय युवक कार्यकर्त्यांची मजबूत फळी बांधण्याचा कार्यक्रम देण्यात आला. यासाठी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपण्यात आली आहे.

पुढील आठवड्‌यात संग्राम कोते पाटील राज्याचा दौरा करून 10 जून पर्यंत हे संघठन बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्‍यात युवकांची शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबीरांसाठी पक्षातल्या सर्व जेष्ठ नेत्यांनी उपस्थित रहावे लागणार आहे. या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना वक्‍ता प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

मागील दोन वर्षापासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने राज्यभरात विविध विषयांच्या संदर्भात आक्रमक आदोलने, मोर्चे काढले आहेत. 1900 नवीन युवक राष्ट्रवादीच्या शाखा स्थापन करण्यात आल्या तर 27 जिल्हास्तरीय मेळावे घेतल्याची माहीती युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख