आम्हाला पंकज भुजबळ हवेत....'राष्ट्रवादी'च्या जुन्या नेत्यांना कार्यकर्त्यांचा इशारा

ले काही दिवस येवल्यापाठोपाठ छगन भुजबळ यांचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघात नांदगावलाही त्यांना विरोध सुरू होता. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या समर्थनासाठीही कार्यकर्ते पुढे येत आहेत. मनमाड येथे झालेल्या मेळाव्यात "आम्हाला विकासासाठी भुजबळ हवेत,'' असा नारा त्यांनी दिला.
आम्हाला पंकज भुजबळ हवेत....'राष्ट्रवादी'च्या जुन्या नेत्यांना कार्यकर्त्यांचा इशारा

नांदगाव : गेले काही दिवस येवल्यापाठोपाठ छगन भुजबळ यांचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघात नांदगावलाही त्यांना विरोध सुरू होता. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या समर्थनासाठीही कार्यकर्ते पुढे येत आहेत. मनमाड येथे झालेल्या मेळाव्यात "आम्हाला विकासासाठी भुजबळ हवेत,'' असा नारा त्यांनी दिला. ज्यांनी भुजबळांना विकासासाठी नांदगांव मतदारसंघात आणले ते आज राजकीय फायद्यासाठी भुजबळांना सोडून गेले असतील. मात्र आम्ही कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असा निर्धार समर्थक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.

शहरालगतच्या मनमाड रस्त्यावर असलेल्या फुलेनगर येथील मातोश्री मंगल कार्यालायात आयोजित या मेळाव्याला नांदगाव विधानसभा मतदार संघातील मोठ्या प्रमाणात भुजबळ समर्थक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीमधील जुन्या नेते पदाधिकऱ्यांचा भालुर येथील बैठकीत 'आता भुजबळ नकोच' हा नारा लावण्यात आला होता. त्याला आज मातोश्री मंगल कार्यालयातल्या मेळाव्याने उत्तर देण्यात आले पंकज भुजबळ वछगन भुजबळ हे विकास पुरुष आहेत त्यांच्या शिवाय नांदगांव तालुक्याचा विकास कोणी करु शकलेले  नाही त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असा बहुतांशी वक्त्यांचा सूर दिसून आला तसेच 'भुजबळ नको' म्हणणाऱ्यांचा समाचारही घेण्यात आला 

या मेळाव्यात राजेंद्र नहार, मनमाडचे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, राईस फारुकी, नांदगावचे माजी नगराध्यक्ष रामनिवास कलंत्री, डॉक्टर वाय. पी. जाधव, भाऊसाहेब सूर्यवंशी, संजय जाधव, दत्तू पवार आदी भुजबळ समर्थकांची भाषणे झाली. आमदार पंकज  भुजबळ हे पुन्हा नांदगांव मतदार संघातून विजयी होतील असा विश्वास या सर्वांनी व्यक्त केला.  'ज्यांनी आमदार भुजबळ यांना विरोध केला त्यांनी देखील आत्मपरिक्षण करावे, आम्ही निर्भयपणे त्यांच्या पाठिशी उभे राहू. आज पर्यंत निवडून गेलेल्या पैकी सर्वात जास्त व भरीव विकास कामे करणा-यांत  पंकज भुजबळ यांचेच नाव घेतले जाते,' असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com