NCP Students wing President Ajinkyarana Patil Resigns | Sarkarnama

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

अजिंक्यराणा पाटील हे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे सुपूत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडत असताना राजन पाटील मात्र शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यासोबत राहिले

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी अचानकपणे राजीनामा दिल्याने सर्वाना धक्का बसला, मात्र 'आपल्या पदाची मुदत संपल्याने आपण राजीनामा दिल्याचे पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. "माझ्यावर विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी ऋणी आहे." असे सांगून पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले."असे म्हटले आहे.

संबंधित लेख