सरकार घाबरल्याने जमावबंदी आदेश : जयंत पाटील 

आलमटटी धरणातून विसर्ग न झाल्यानेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापूर आला आहे. -जयंत पाटील
Jayant_Patil_NCP
Jayant_Patil_NCP

कोल्हापूर :जिल्ह्याला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. शासनाची मदत येण्यास विलंब झाल्याने पुरग्रस्तांमध्ये संतापाची लाट आहे. पूर ओसरत आहे तसा लोकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. त्यांच्या या उद्रेकाला सरकार घाबरले आहे. म्हणूनच त्यांनी जमावबंदीसारखा तुघलकी, हुकुमशाही आदेश काढला असल्याची टीका, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली. 

यावेळी आ.पाटील यांनी पूरग्रस्तांच्या संपूर्ण कर्जमाफीसह नुकसानभरपाईची मागणी केली. पत्रकार परिषदेस आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी.पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,शहारध्यक्ष आर.के.पोवार आदी उपस्थित होते. 

आमदार पाटील म्हणाले,'' आलमटटी धरणातून विसर्ग न झाल्यानेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापूर आला आहे. पुराचे नियोजन करण्यात सरकारी अपयशी ठरले आहे. या महापुरात शेतीसह घरादाराचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण शेतीच वाहून गेली आहे. ज्या भागात मोठा पूर आहे इथे बहुतांश उसाची शेती आहे. ही शेती नष्ट झाले आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. त्याचबरोबर एकरी एक लाख रुपयांची मदत या शेतकऱ्यांच्या खात्यात विनाविलंब जमा करण्यात यावी. उसाशिवाय जी अन्य पिके आहेत त्यांना एकरी 40 हजाराची मदत द्यावी." 

" शासनाने जी दहा आणि 15 हजार रुपयांची मदत केली आहे ती अत्यंत तोकडी आहे. ही मदत वाढणे गरजेचे आहे. विरोधक म्हणून आम्ही चुका दाखवत आहोत. त्यात दुरुस्ती करणे सरकारचे काम आहे. त्यामुळे 2005 ला काय केले आणि 2014 ला काय केले, यात सरकार पडणार नाही",अशी अपेक्षा आ.पाटील यांनी व्यक्‍त केली. 

"विरोधकांकडून ज्या सुचना दिल्या जात आहेत त्याचा शांतपणे विचार करणे आवश्‍यक आहे. त्यावर मार्ग काढण्याची शासनाने भूमिका घ्यावी, असे अपेक्षित आहे.मात्र असे न करता जमावबंदी लावून शासन सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबत आहे, " असा  आरोप आ.पाटील यांनी केला. राष्ट्रवादीकडून पुरग्रस्तांसाठी विविध साहित्य देण्यात येणार आहे. या मदतीतील पहिला ट्रक सोमवारी जिल्हा राष्ट्रवादीकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com