NCP Shivsena and Congress May Meet Maharashtra Governor on Monday
NCP Shivsena and Congress May Meet Maharashtra Governor on Monday

नवीन आघाडीचे शिष्टमंडळ सोमवारी राज्यपालांच्या भेटीला?

राज्यात नव्याने आकारास आलेल्या शिवसेनाद्व कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांची राज्यपालासोबत होणारी आजची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या पक्षांचे नेते त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत असून येत्या सोमवारी ही भेट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : राज्यात नव्याने आकारास आलेल्या शिवसेनाद्व कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांची राज्यपालासोबत होणारी आजची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या पक्षांचे नेते त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत असून येत्या सोमवारी ही भेट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील पूरग्रस्तंच्या मदतीसाठी नवीन आघाडीतील नेते राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना भेटणार होते. पण, ही भेट पुढे ढकलण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे एक शिष्टमंडळ सायंकाळी साडेचार वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार त्यांच्या मतदार संघात असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नियोजित भेट पुढे ढकलली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी ही भेट होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

किमान समान कार्यक्रम तयार
नवीन आघाडीच्या नेत्यांमध्ये दोन दिवस बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता तिन्ही पक्षांचा मिळून किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यासाठी तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी आग्रही होते. हा कार्यक्रम तयार असून, तो श्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याची माहिती कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com