राष्ट्रवादीला आठ आमदारांचा शोध : पिंपरीचे अण्णा बनसोडे यांनी गुंगारा दिलाच!`

...
anna bansode and ajit pawar
anna bansode and ajit pawar

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या 54 आमदारांपैकी आठ आमदारांचा अद्याप पक्षाच्या नेत्यांशी संपर्क झालेला नाही. या आठ नेत्यांत अर्थात अजित पवारांचाही समावेश आहे.

त्यातील दौलत दरोडा, नितीन पवार, बाबासाहेब पाटील या आमदारांनी आपण सुखरूप असल्याचा व्हिडीओ मेसेज तरी पाठवला आहे. आपण पक्षासोबत आणि पवार साहेबांसोबत असल्याचा प्रयत्न केला. मात्र पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, अहेरीचे धर्मरावबाब अत्राम यांनी पक्षाला गुंगारा दिला आहे. नरहरी झिरवाळ यांच्याशीही पक्षाचा संपर्क झालेला नाही.

या आमदारांना भाजपने गुजरातमध्ये ठेवल्याचे बोलले जात आहे. हे आठजण अजित पवार यांच्यासोबत काल शपथविधीला उपस्थित होते की नाही, हे कळू शकले नाही. शपथविधी झाल्यानंतर त्यांना बोलावून घेण्यात आले आणि त्यांची खास विमानाने रवानगी करण्यात आली. भाजपकडून आमदार प्रसाद लाड यांनी हे आॅपरेशन केल्याचे सांगण्यात आले.

अण्णा बनसोडे हे आपण पक्षासोबत राहणार असल्याचे काल सकाळी आपल्य कार्यकर्त्यांना सांगत होते. तसेच आपण पक्षाच्या यशवंतराव चव्हाण सेंटरवरील बैठकीलाही जात असल्याचा निरोप त्यांनी दिला. मात्र त्यांनी गुंगारा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. बनसोडे यांना पक्षाने या निवडणुकीत सुरवातीला उमेदवारी दिली नव्हती. अजित पवार यांनी आधीच्या उमेदवाराचे तिकिट रद्द करून ते बनसोडेंना दिले. त्यामुळे बनसोडे हे अजितदादांसोबतच राहतील, असा अंदाज आहे.  

राष्ट्रवादीच्या आमदारांना रेनिसीन्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. येथे साध्या वेषात आलेल्या पोलिसांना राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांनी हॉटेलच्या आत कसे आलात?काय करत आहात, येथे कोणाला माहिती देत आहात, असा जाब विचारला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या हाॅटेलमधील आमदारांशी चर्चा केली. 

दरम्यान शरद पवार हे उद्या (सोमवारी) कराड दौऱ्यावर जाणार आहे. सकाळी 8.15 वाजता कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुण्यतिथी कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर 10 वाजता वेणूताई ट्रस्टच्या मिटिंगला राहणार हजर राहणार. सकाळी 11.30  वाजता गाडगे महाराज महाविदयलायतील कार्यक्रमाला उपस्थिती.आणि त्यानंतर दुपारी एक वाजता सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमास हजेरी लावून पवार संध्याकाळी पुन्हा मुंबईत येणार आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com