संधी द्या, पाच वर्ष प्रामाणिकपणे काम करेन: संजय निंबाळकर

..
sanjay-Nimbalkar-NCP
sanjay-Nimbalkar-NCP

उस्मानाबाद :  पक्षाने माझ्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर विश्‍वास टाकून जबादारी दिली आहे, शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एकदा मला संधी द्या, पाच वर्ष प्रामाणिकपणे काम करीन अशी ग्वाही उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी- कॉंग्रेस महाआघाडीचे संजय निंबाळकर यांनी दिली.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निंबाळकर हे महाआघाडीकडून रिंगणात आहेत. मतदारसंघातील गावोगावी पदयात्रा काढून, कोपरा बैठका, सभा घेऊन थेट मतदारांशी संवाद साधत त्यांनी प्रचार सुरू केला आहे. आपली भूमिका मांडत असतांना महाआघाडीचा शपथनामा काय आहे, याची माहिती ते मतदारांना देत आहेत.

महिला उद्योजकांना पहिल्या तीन वर्षांपर्यंत कर्जावरील व्याज व कर माफी, आशा व अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, 65 वर्षांवरील उत्पन्न नसलेल्या ज्येष्ट नागरिकांना दरमहा दीड हजार रुपये पेन्शन, मराठवाड्यासाठी स्वतंत्र कृषी महामंडळ अशा ठळक बाबींचा उल्लेख निबांळकर आपल्या भेटी दरम्यान करत आहेत.

निंबाळकर म्हणाले, शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सध्या बेरोजगारी वाढली आहे. हाताला काम नसल्यामुळे युवक चुकीच्या मार्गावर जात आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून मतदारसंघातील युवकांना मदत करणार असल्याचे सांगतानाच सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार, फक्त आश्वासन नाही तर प्रत्यक्ष कृती करणार असल्याचा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला.

मतदारसंघात शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे, उद्योगाचा अभाव असल्याने बेरोजगारीचा प्रश्न आहे. शेतीला जोडधंद्यासाठी पुरेसे कर्ज मिळत नाही, हे प्रश्न सोडविण्याबरोबरच गावागावांत मैदाने तयार करून ग्रामीण तरुणांना राष्ट्रीय खेळांसाठी प्रोत्साहित करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही निंबाळकर सांगतात.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com