NCP Roopali Chakankar;s Criticism on Medha Kulkarni | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मेधा कुलकर्णींना कोथरुडमधून पराभूत करु - रुपाली चाकणकर

ज्ञानेश सावंत 
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना कुलकर्णी यांनी सामाजातील असमानतेवर भाष्य केले. "सध्या समाजात असमानता निर्माण केली जात असल्याचे सांगून, कुलकर्णी यांनी पवार यांच्या कडे बोट दाखविले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, या पक्षाच्या महिला नेत्या आपापल्या पध्दतीने कुलकर्णी यांनी केलेली टीका खोडून काढत आहेत. 

पुणे : सामाजिक असमानतेचा मुद्दा पटवून देताना 'बारामतीकर' असा उल्लेख करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप आमदार मेधा कुलकर्णींना आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी लक्ष्य केले आहे. 'शिस्त आणि वैचारिकतेची मिजास मिरवणाऱ्या संघाच्या मुशीत वाढूनही कुलकर्णी हल्ली नेहमीच जातीयवादावर का बोलत आहेत,' असा खोचक प्रश्‍न पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला. 

"अशा बोलण्याचे परिणाम कुलकर्णींना भोगावे लागणार असून, आगामी निवडणुकीत त्यांना कोथरुडमधून पराभूत करू,'' असे इशारे वजा आव्हानही चाकणकरांनी दिले आहे. त्यामुळे कुलकर्णी-चाकणकर यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना कुलकर्णी यांनी सामाजातील असमानतेवर भाष्य केले. "सध्या समाजात असमानता निर्माण केली जात असल्याचे सांगून, कुलकर्णी यांनी पवार यांच्या कडे बोट दाखविले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, या पक्षाच्या महिला नेत्या आपापल्या पध्दतीने कुलकर्णी यांनी केलेली टीका खोडून काढत आहेत. 

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही कुलकर्णी यांचा नुकताच खरपूस समाचार घेतला. ''फुले-शाहू-आंबेडकर झिजले नसते तर, मेधा कुलकर्णींना आजघडीला घरी भाकरी थापाव्या लागल्या असत्या,'' अशा शब्दांत वाघ यांनी पवारांवरील टीकेचा वचपा काढला. त्यापाठोपाठ चाकणकर यांनीही 'सोशल मीडिया'तून कुलकर्णी यांच्यावर बोचरी टीका केली. 

चाकणकर म्हणाल्या, "जातीयवाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मेधा कुलकर्णी आपला अजेंडा राबवित आहेत. त्या सातत्याने जाती-धर्मावरून बोलत आहेत. ज्यामुळे निवडणूक जिंकता येईल, अशी आशा त्यांना असावी. पण, अशा पध्दतीने तेढ निर्माण करणे कुलकर्णी यांना परवडणारे नाही. जातीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या कुलकर्णींना कोथरुडमधून हरवू. त्यासाठी मतदार एकत्र येतील.'' दरम्यान, राष्टवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव मोहिमेत कुलकर्णी यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे, असेही चाकणकर यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख