सत्तेच्या राजकारणात गुरफटलेल्यांच्या डोळ्यात अंजन घालणार पवारांचा विदर्भ दौरा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरही जवळपास सर्वच पक्षांतील बडे नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. या सर्व गोंधळातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज विदर्भातील शेतीपिकांच्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. येवढेच नव्हे तर बाधांवर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत.
NCP Leader Sharad Pawar to Visit Vidarbha Farmers
NCP Leader Sharad Pawar to Visit Vidarbha Farmers

नागपूर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरही जवळपास सर्वच पक्षांतील बडे नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. या सर्व गोंधळातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज विदर्भातील शेतीपिकांच्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. येवढेच नव्हे तर बाधांवर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही सर्वात आधी पवार शेतकऱ्यांच्या बांधांवर पोचले होते. त्यानंतर मग इतर पक्षांतील नेत्यांनी त्यांचा कित्ता गिरवला आणि आमदारांपासून ते अगदी नगरसेवकांपर्यंत सर्वांनी शेतींमध्ये जाण्याचा सपाटाच लावला.

पवारांच्या दौऱ्याचा राजकीय घडामोडींशी संबंध नसून अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी पिकांच्या झालेल्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तेचा सारिपाट शरद पवार यांच्याभोवतीच फिरत आहे. कॉंग्रेसने शिवसेनेलाॉ पाठिंबा द्यायचा की नाही तसेच सत्तेत सहभाही होण्याची भूमिका घेतल्यास मंत्रिपदाचे वाटप व समान कार्यक्रमाची आखणी करण्याची जबाबदारी पवार यांच्यावरच सोपविण्यात आली आहे.

सध्या रोज घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे सर्वच पक्षातील बडे नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. या धावपळीतही पवार पीकपाण्याचा आढावाच नव्हे तर बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. 14 नोव्हेंबरला ते पूर्व विदर्भातील पीकपाण्याची पाहणी करणार आहेत. उद्या मुक्काम केल्यानंतर 15 नोव्हेंबरला सकाळी ते पत्रकारांशी संवाद साधतील.

त्यानंतर कडबी चौक स्थित मेकोसाबाग शाळेच्या मैदानावर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला दुपारी दोन वाजता ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पवारांचा हा दौरा केवळ सत्तेचे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरणार, हे मात्र नक्की. त्यांच्या या दौऱ्यानंतर इतर नेतेही शेतकऱ्यांच्या शेतांच्या बांधांवर गर्दी करतील, याचीही शक्‍यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com