..तेव्हा पवार साहेबांनी हेलिकॉप्टरच्या पायलेटलाही दिशा दाखवली होती

संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मार्ग दाखवत सुखरूप बाहेर काढण्याची शरद पवार साहेबांची हातोटी सर्वश्रुत आहे. या बाबतचा एक किस्सा आमदार विक्रम काळे यांनी सांगितला आहे
MLA Vikram Kale Giving Compiments to Sharad Pawar
MLA Vikram Kale Giving Compiments to Sharad Pawar

औरंगाबाद : संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मार्ग दाखवत सुखरूप बाहेर काढण्याची शरद पवार साहेबांची हातोटी सर्वश्रुत आहे . प्रसंग 2014च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आहे. पवार साहेब उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आले होते .परंतु जिल्ह्यात अचानक अतिवृष्टी झाली आणि साहेबांनी प्रचार सभा रद्द करत शेतीमालाचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी जाण्याचे ठरवले

उस्मानाबादहून मी आणि साहेब हेलिकॉप्टरने निघालो, थोड्या अंतरावर गेल्यानंतर पायलटने पुढे पाऊस असल्यामुळे हेलिकॉप्टर घेऊन जाणे शक्य नाही , आपल्याला आता इमर्जन्सी लँडिंग करावे लागेल असे सांगितले .

परंतु, हेलिकॉप्टर आता कुठे उतरावे? हेलिपॅड कुठे आहे? याचा पायलटला अंदाज येत नव्हता .पायलट गोंधळल्यामुळे थेट पवार साहेबांनी त्याला मार्गदर्शन केले. हेलिकॉप्टर उंचावर असल्यामुळे खाली हेलिपॅड कुठे आहे , हे गाव कोणते याचा अंदाज बांधणे केवळ अशक्य होते. पण शरद पवार साहेबांचा महाराष्ट्रातील गावांगावांचा असलेला अभ्यास किती दांडगा आणि सूक्ष्म आहे याचा अनुभव त्यादिवशी आला .साहेबांनी पायलटला आपण अंबाजोगाईच्या जवळ आहोत , आणि इथे निश्चितच कुठेतरी हेलिपॅड असेल तुम्ही सावधतेने हेलिकॉप्टर खाली घ्या, अशी सूचना केली.

पायलटने  साहेबांच्या सांगण्यानुसार हेलिकॉप्टर खाली घेतले आणि थोड्याच वेळात एका मैदानात शेजारी हेलिपॅड असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले .त्यानंतर पायलटने हेलिकॉप्टरचे सुरक्षितपणे लँडिंग केले आणि एका मोठ्या संकटातून आम्ही सगळेजण वाचलो.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com