राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या रॅलीत आमदार जगताप, मंजुषा गुंडही उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या रॅली व मेळाव्यास आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप यांच्याबरोबरच पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंडही उपस्थित आहेत. तिघांचेही पक्षांतर होणार असल्याची चर्चा सुरू असल्याने त्यांच्या उपस्थितीबाबत जिल्ह्यात उत्सुकता होती.
Meeting of NCP President Sharad Pawar at Nagar
Meeting of NCP President Sharad Pawar at Nagar

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या रॅली व मेळाव्यास आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप यांच्याबरोबरच पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंडही उपस्थित आहेत. तिघांचेही पक्षांतर होणार असल्याची चर्चा सुरू असल्याने त्यांच्या उपस्थितीबाबत जिल्ह्यात उत्सुकता होती.

मंजुषा गुंड यांनी कर्जत-जामखेडमधून उमेदवारी मागितली आहे. मात्र या मतदारसंघात रोहित पवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असल्याने त्या नाराज होत्या. त्या भाजपमध्ये जाण्याची शक्यता असताना आज मात्र पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमांना गुंड यांची उपस्थिती होती. त्यामुळे त्यांच्या भुमिकेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

आपण शरद पवार यांना भेटण्यास आलो असून, कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहोत. कर्जत-जामखेडमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहोत, पवार यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे गुंड यांनी `सरकारनामा` शी बोलताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com