पालकमंत्री पदाची चर्चा म्हणजे बाजारात तुरी : ए.वाय. पाटील 

आता विनाकारण मतभेदाचे मुद्दे न आणता जनतेच्या हिताचे काम करावे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा व इच्छा आहे- ए. वाय. पाटील
ncp opposes satej patil statemnet
ncp opposes satej patil statemnet

कोल्हापूर : राज्यात नवे सरकार आले असले तरी अजुन मंत्री मंडळाचा विस्तार नाही, कोणाला संधी मिळणार हे स्पष्ट नाही. तोपर्यंत पालकमंत्री पदाचा मुद्दा काढून विनाकारण गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नाही. जे काही ठरवायचे ते श्रेष्ठी ठरवतील. यावर आताच चर्चा करणे म्हणजे "बाजारात तुरी आणि................' या म्हणीप्रमाणे परिस्थिती होईल, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना नांव न घेता लगावला आहे.

ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाते. जिल्ह्यात कॉंग्रेसचे आमदार जास्त असल्याने कॉंग्रेसलाच हे पद मिळेल, असे आमदार पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्याला आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पत्रकातून प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, 1999 मध्ये जिल्हयामध्ये सर्वात जास्त राष्ट्रवादी पक्षाचे पाच आमदार असताना पालकमंत्री म्हणून दिवंगत पतंगराव कदम यांच्याबरोबर सर्व आमदारांनी काम केले. 2004 साली राज्यामध्ये सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून येऊनही मुख्यमंत्री पदावर कांग्रेस पक्षाला संधी देण्याचे मोठे मन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केले. त्यानंतर 2009 सालीसुध्दा एकत्र संसार केला व 15 वर्षे कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्रीपद कांग्रेस पक्षाकडे राहिले व ते देण्याची दानत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दाखवली. आता विनाकारण मतभेदाचे मुद्दे न आणता जनतेच्या हिताचे काम करावे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा व इच्छा आहे, असे शेवटी पत्रकात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com