ncp office bearers on flex board with bjp MLA landage | Sarkarnama

महेश लांडगेंच्च्या फ्लेक्सवर राष्ट्रवादीचेही पदाधिकारी : `भावी खासदार` होण्यासाठी पुन्हा फिल्डिंग!

उत्तम कुटे
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018
पिंपरीः भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या २७ नोव्हेंबरच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लागलेल्या फ्लेक्सवर राष्ट्रवादीचेही पदाधिकारी झळकल्याने तो शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

आगामी लोकसभा व विधानसभेची मोर्चेबांधणीचा एक भाग म्हणून महेशदादांनी ही खेळी खेळल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तर, ही राजकारणापलिकडील मैत्री असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. दरम्यान, सध्या भोसरीत महेशदादांच्या वाढदिवसाचा फिव्हर असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडसह शिरूर मतदारसंघातही महेशदादांच्या अभिष्टचिंतनाचे फ्लेक्स लागल्याने त्यांचे नाव लोकसभेसाठी यानिमीत्त पुन्हा चर्चेत आले आहे. त्यावर इतर भाजप नेते वगळता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच छबी आहे. अनेक फ्लेक्सवर, तर त्यांचा उल्लेख भावी खासदार असा आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला,तर भोसरीचे हे पैलवान विधानसभा सोडून लोकसभेच्या आखाड्यातही उतरण्याची शक्यता आहे. तशी त्यांची तयारी सुरुच होती. मध्ये ही तयारी व चर्चा काहीशी थांबली होती. यानिमित्ताने ती पुन्हा एकदा जोरदारपणे सुरु झाली आहे.

महेशदादा लांडगे हे अगोदर राष्ट्रवादीत होते. अजितदादांचे ते कट्टर समर्थक होते. मात्र, २१०४च्या विधानसभेला त्यांना पक्षाने तिकिट दिले नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. ते अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर ते समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले. गेल्या वर्षी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत त्यांनी प्रथमच भाजपची सत्ता आणण्यात मोठा वाटा उचलला. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीबरोबर शिवसेनाही त्यांचा कट्टर विरोधक पक्ष झालेला आहे.

तरीही राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आणि माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ यांचे फोटो दादांच्या फ्लेक्सवर झळकले आहेत. मात्र, ही राजकारणापलिकडील मैत्री असून ती आम्ही गेली कित्येक वर्षे जपल्याचे शितोळे यासंदर्भात म्हणाले.पूर्वी एकाच पक्षात असल्याने हा स्नेह निर्माण झाला असून तो राजकारणापलिकडचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशीच प्रतिक्रिया मिसाळ यांनीही दिली. महेशदादा आमदार नसल्यापासूनची आमची मैत्री असल्याचे त्यांनी सांगितले.

re>
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख