नाशिकला राष्ट्रवादी नंबर वन; भाजपला मिळाल्या 5 जागा

मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक आणि निवडणुकीचा अचुक अंदाज व्यक्त करण्याचा दावा करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सर्व गणिते नाशिकच्या मतदारांनी बिघडवली. जिल्ह्यात सर्वाधिक सहा जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. भारतीय जनता पक्षाला एक जागेचा लाभ होऊन ती पाच वर गेली. मात्र, यामध्ये शिवसेनेचे प्रतिष्ठेचे मोहरे पराभूत होऊन त्यांची संख्या निम्म्याने घटत अवघ्या दोनवर आल्याने त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली.
Chagan Bhujbal - Girish Mahajan
Chagan Bhujbal - Girish Mahajan

नाशिक : मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक आणि निवडणुकीचा अचुक अंदाज व्यक्त करण्याचा दावा करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सर्व गणिते नाशिकच्या मतदारांनी बिघडवली. जिल्ह्यात सर्वाधिक सहा जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. भारतीय जनता पक्षाला एक जागेचा लाभ होऊन ती पाच वर गेली. मात्र, यामध्ये शिवसेनेचे प्रतिष्ठेचे मोहरे पराभूत होऊन त्यांची संख्या निम्म्याने घटत अवघ्या दोनवर आल्याने त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली.

नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघ आहेत. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (येवला), नरहरी झीरवाळ (दिंडोरी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), दिलीप बनकर (निफाड), नितीन पवार (कळवण), सरोज अहिरे (देवळाली) सहा जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी झाली. भारतीय जनता पक्षाने आपल्या सीमा हिरे (नाशिक पश्‍चिम), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), राहूल ढिकले (नाशिक पूर्व), डॉ. राहुल आहेर (चांदवड) या जागा कायम ठेवत दिलीप बोरसे (बागलाण) हा बोनस मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र, शिवसेनेला राज्यमंत्री दादा भुसे (मालेगाव बाह्य) व सुहास कांदे (नांदगाव) या दोनच जागांवर समाधान मानावे लागले. 'एमआयएम'चे मौलाना मुफ्ती ईस्माईल (मालेगाव मध्य) आणि कॉंग्रेसचे हिरामण खोसकर (इगतपुरी) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली.

जिल्ह्यातील पंधरा जागा असुन मालेगाव मध्य मतदारसंघाचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व जागांवर भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा मंत्री महाजन यांनी केला होता. लोकसभेला उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व आठ जागांवरल कब्जा करीत त्यांनी आपला प्रभाव वाढवला होता. त्याआधारेच त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील 47 पैकी 45 जागा जिंकु असा दावा केला होता. त्यात नाशिकला एक जागेचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व 14 जागांचा दावा त्यांनी केला होता. हा दावा पुर्णतः फोल ठरला. 

विशेषतः सलग तीस वर्षे शिवसेनेकडे असलेली देवळाली (योगेश घोलप), प्रतिष्ठेचा निफाड (आमदार अनिल कदम) आणि सिन्नरला राजाभाऊ वाजे हे त्यांचे महत्वाचे मोहरे या निवडणुकीत कामी आली. त्यांच्या जागा निम्म्याने घटल्या. शिवसेनेला भाजपने शहरात तीन पैकी एकही जागा न सोडल्याने त्यांनी बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांच्या मागे ताकद उभी केली होती. मात्र तिथेही त्यांचा प्रभाव पडला नाही. 

कॉंग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत आलेल्या आमदार निर्मलाताई गावित यांचाही धक्कादायक व लाजीरवाना पराभव झाला. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे आमदार पंकच छगन भुजबळ (नांदगाव) आणि आमदार दीपिका चव्हाण (बागलाण) यांचा पराभव झाला. मात्र, त्याऐवजी त्यांनी सिन्नर, निफाड, देवळाली या तीन जागा त्यांनी खेचून आणल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचा फायदाच झाला. एकंदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात नंबर वन झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com