प्रदेशाध्यक्ष पदाबाबत कोणतीही चर्चा नाही : शशिकांत शिंदे

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत पुढे येत आहेत. पण सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी श्री. शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत.
No Decision about NCP State President post Say Shashikant Shinde
No Decision about NCP State President post Say Shashikant Shinde

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश्याध्यक्ष पदाबाबत अद्याप कोणताही निर्णय पक्षाने जाहीर केलेला नाही. तसेच पक्ष आणि पक्ष्याध्यक्ष यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात पक्ष जो निर्णय घेईल, जी जबाबदारी देईल ती पार पडण्यास माझी तयारी आहे, अशी प्रतिक्रिया कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत पुढे येत आहेत. पण सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी श्री. शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. पण राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष किंवा इतर कोणीही याबाबत अद्याप  काहीही जाहीर केलेले नाही. 

त्यामुळे नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ''अद्याप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काहीही जाहीर केलेले नाही. कोणीतरी  सोशल मीडियावर माहिती टाकली आहे. या पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शरद पवार आणि पक्ष  यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून माझ्यावर विश्वास टाकला. तसेच माझ्याकडे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दिली. भविष्यात पक्ष जो निर्णय घेईल, जी जबाबदारी मला देईल ती यशस्वीपणे पार पडण्यास माझी तयारी असेल,'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com