ncp , mumbai | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राष्ट्रवादीचे राज्यभर "युवा जोडो' अभियान

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबई : राज्यातल्या तरूण वर्गात राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा उजळावी यासाठी पक्षाने युवकांचे संघठन मजबूत करण्यासाठी राज्यभरात नवीन शाखा उघण्याची मोहिम सुरू केली आहे. 23 जुलैपासून सुरू झालेल्या या अभिनव मोहिमेमुळे आतापर्यंत 400 नव्या शाखांची उभारणी करण्यात आल्याची माहीती युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिली. 

पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमीत्त साधत युवक राष्ट्रवादीने राज्यभरात पहिल्या टप्प्यात पाच हजार शाखा उभारण्याचा संकल्प केला आहे. मागील पंधरा दिवसांत तब्बल युवक राष्ट्रवादीच्या चारशे नवीन शाखांचे उद्‌घाटन करण्यात आल्याचे कोते पाटील यांनी सांगितले. 
या अभिनव मोहिमेतून दोन लाख युवक राष्ट्रवादशी जोडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक शहरात वॉर्ड तिथे तर प्रत्येक गांवात "राष्ट्रवादी युवक' चे संघठन बांधणीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यातील युवकांनी पुरोगामी व लोकशाहीवादी विचारांची सोबत करत सामाजिक स्थैर्य व सौहार्द यांना प्राधान्य द्‌यावे असा यामागचा हेतु असल्याचे कोते पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे शक्‍तीस्थान ग्रामीण भाग असला तरी शहरी युवकांना लोकशाहीवादाच्या चळवळीत जोडण्याची नितांत गरज असल्याची भावना पुढे येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या लोकशाही विचारांची नवी पिढी राज्यात नव्या जोमाने उभी राहील यासाठी युवक राष्ट्रवादीने गाव तिथे शाखा उभारण्याचा संकल्प सोडला असल्याचे ते म्हणाले. 

पहिल्या टप्प्यात पाच हजाह तर पुढील वर्षभरात नवीन पाच हजार युवक राष्ट्रवादीच्या शाखा केवळ राजकीय हेतुने प्रेरित होवून नव्हे तर लोकशाहीवादी विचारांच्या कार्यशाळा होतील, असा प्रयत्न असल्याचे कोते पाटील यांनी स्पष्ट केले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख