उदयनराजे विकास निधीसाठी आग्रही नव्हते : सुप्रिया सुळे

सातारा लोकसभेचे प्रतिनिधी बदलल्याने माझी अडचण झाली आहे. कारण पूर्वीचे लोकसभेचे प्रतिनिधी विकास निधीसाठी कधीच आग्रह धरत नव्हते असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लोणंद येथे बोलताना उदयनराजे यांना उद्देशून लगावला
MP Supriya Sule and MLA Makrand Patil in Lonand Programme
MP Supriya Sule and MLA Makrand Patil in Lonand Programme

लोणंद  (जि. सातारा) : सातारा लोकसभेचे प्रतिनिधी बदलल्याने माझी अडचण झाली आहे. कारण पूर्वीचे लोकसभेचे प्रतिनिधी विकास निधीसाठी कधीच आग्रह धरत नव्हते, त्यामुळे तो निधीही मलाच मिळत होता. मात्र, सध्याचे लोकप्रतिनिधी श्रीनिवास पाटील हे सर्व माहिती असणारे लोकप्रतिनिधी आहेत.त्यामुळे पूर्वीसारखा आता निधी मला मिळणार नाही,'' असे प्रतिपादन  खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले. पाटील यांची स्तुती करतानाच सौ. सुळे यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांना टोलाही लगावला.

खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघ व खंडाळा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथे पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार दिन,राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण तसेच गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी कृषी सभापती मनोज पवार,सदस्या दिपाली साळुंखे,उपसभापती वंदनाताई धायगुडे -पाटील, खंडाळा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव, तहसिलदार दशरथ काळे,गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, गटशिक्षण अधिकारी गजानन आडे, विनोद कुलकर्णी,अजय भोसले,यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार साम टी.व्हीचे संपादक निलेश खरे तर जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर यांना 'जीवन गौरव पुरस्कार देवून खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या गुणवंतांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कारण्यात आला.

सुळे म्हणाल्या, ''वर्तमानपत्र वाचन ही आपली संस्कृती आहे. भाषा सुधारण्यासाठी वर्तमानपत्र वाचन गरजेचे आहे.पत्रकारांनी मनमोकळे काम करावे. महिलांना व इतर क्षेत्रात न्याय मिळण्यासाठी समानता आणली पाहिजे. पत्रकार व नेते हे नात काही वेळा  अडचणीचे ठरते. सातारा जिल्हा हे पवार साहेबांचे टॉनिक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने पवार साहेबांवर भरभरून प्रेम केले. या प्रेमाच्या नात्याला, विश्वासाला तडा जाता कामा नये. यशवंतराव चव्हाण साहेबांचे आपल्या सर्वांवर संस्कार आहेत. आपले महाआघाडीचे सरकार नवीन ऊर्जेनं , विश्वासाने राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करेल. महिला, अंगणवाडी सेविका, आशा ताई, बचतगट यांचे सगळे प्रश्न प्राधान्य देवून सोडविले जातील.''

आमदार मकरंद पाटील म्हणाले, समाजाचा आवाज दर्पणच्या माध्यमातून मांडण्याच काम झाले. तालुक्यातील पत्रकारांच कौतुक केल पाहिजे. प्रसार माध्यम समाजाचे डोळे म्हणून काम करतात. सत्काराला उत्तर देताना सामचे संपादक निलेश खरे म्हणाले, दर्पण नावातच पत्रकारिता कशी असावी हे दिसते. आजकाल पत्रकार 'दीन ' म्हणून जगतोय. मात्र व्यवस्थापन व सहकाऱ्यांचा पाठींबा असेल तर पत्रकार मनमोकळेपणाने काम करु शकतो.''

मकरंद पाटलांचा होणार सन्मान
चांगले काम करण्यासाठी मंत्रीपदाची गरज नाही, असे सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या,  ''राज्यात मकरंद पाटील यांच्या मतदार संघातील काम अव्वल आहे.आदर्श आमदार कसा असावा, हे मकरंद आबांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. तीन पक्षांचे सरकार असल्याने सर्वांनाच न्याय देवू शकत नाही. मात्र आमदार पाटील यांचा निश्चीत मानसन्मान केला जाईल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com