श्रीनिवास पाटील म्हणतात...अन मला निवडून यायचा नाद लागला!

साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना पराभूत केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षात होतच आहे. पण त्यांनी निवडूकांमध्ये यशस्वी होण्यामागचे गुपीतसांगताना ''महाविद्यालयात असताना 'हिरवळी" चा भक्कम पाठिंबा असल्याने मला जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून येत होतो, तेव्हा पासूनच निवडून यायचा नाद लागला" अशी मिस्कीलपणे टिप्पणी केली.
Satara MP Shriniwas Patil Shares his College Memories
Satara MP Shriniwas Patil Shares his College Memories

पुणे : साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना पराभूत केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षात होतच आहे. पण त्यांनी निवडूकांमध्ये यशस्वी होण्यामागचे गुपीत सांगताना ''महाविद्यालयात असताना 'हिरवळी" चा भक्कम पाठिंबा असल्याने मला जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून येत होतो, तेव्हा पासूनच निवडून यायचा नाद लागला" अशी मिस्कीलपणे टिप्पणी केली. 

निमित्त होते, नामदेवराव मोहोळ विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान आणि मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळातर्फे आयोजीत मामासाहेब मोहोळ यांच्या 37 साव्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे. संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद मोहोळ, सचिव बाळासाहेब गांजवे, महापौर मुरलीधर मोहोळ, कोषाध्यक्ष दिलीप बराटे, विश्वस्त संग्राम मोहोळ, विश्वस्त रोहिदास मोरे, उद्योजक दत्ता गायकवाड, विश्वस्त आणि माजी खासदार नानासाहेब नवले, ग्रुप कॅप्टन गोविंद आपटे यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, "पुण्यात स. प. महाविद्यालयात शनिवार, नारायण, सदाशिव, शुक्रवार पेठेतील 'हिरवळ' होती, तर बीएमसीसी म्हणजे वरड रान होते. हिरवळ म्हणली की जनावरे येणारच की, मी हिरवळीतला जनरल सेक्रेटरी होतो. माझ्यामुळे कुणाचीही काही करायची ताकद नव्हती, त्यामुळे मुल मला पाडायचा प्रयत्न करत, तर मुली मला निवडून देत होत्या. तेव्हापासून मला निवडून यायचा नाद लागला आहे.'' त्यांनी ही कोटी करताच सभागृहातील उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ झाला. 

मामासाहेब मोहोळ यांच्या कार्याचा गौरव करताना पाटील म्हणाले, ''पुर्वीच्या काळी ग्रामीण भागातील लोक आर्थिक समस्येच्या चक्रव्युवाहात अडकले होते. त्यांना बाहेर पडता येत नव्हते. ते ओळखून मामासाहेब मोहोळ यांनी शक्ति आणि बुद्धिची सांगड घालत पुणे जिल्ह्यात शिक्षण आणि आखाड्यांचे जाळ निर्माण केल्याने ग्रामीण भागातील जनतेचे भविष्य उजळले.''  

यावेळी बाळासाहेब गिरी, रामदास रोडे आणि लक्ष्मण दरोडे या गुणवंत शिक्षकांचा सत्कार पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बाळासाहेब गांजवे यांनी, तर सूत्रसंचालन संजय भामरे यांनी केले. आभार विश्वस्त संग्राम मोहोळ यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com