राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी खासदार डॉ अमोल कोल्हे दोन दिवस नाशिक तळ ठोकणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार दि.११ व शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार आहेत.
NCP MP Dr. Amol Kolhe
NCP MP Dr. Amol Kolhe

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार दि.११ व शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार आहेत.

शुक्रवार (ता. ११) डॉ. अमोल कोल्हे यांची आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ सकाळी ११ वाजता    मुंजवाड ता बागलाण येथे सभा होणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ दिंडोरी येथे बाराला सभा होणार आहे. दुपारी तीनला अॅड.माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सिन्‍नर येथे ते जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाचला  आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे रोड शो होईल. रात्री आठला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ येवला येथे  जाहीर सभा होणार आहे.

शनिवारी सकाळी अकराला आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ कळवाडी ता. मालेगांव येथे जाहीर सभा घेणार आहे. त्यानंतर मालेगाव बाह्यचे उमेदवार डॉ.तुषार शेवाळे व मालेगाव मध्यचे उमेदवार शेख आसिफ शेख यांच्या प्रचारार्थ मालेगांव येथे जाहीर सभा घेणार असून दुपारी १.३० ते ५ या वेळेत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप,  पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अपूर्व हिरे व  देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरात रोड शो व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com