आता राष्ट्रवादीचे आमदार 'हयात'मध्ये, तर शिवसेनेचे 'लेमन ट्री' मध्ये

शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपापल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे.
NCP - Shivsena
NCP - Shivsena

मुंबई :  राष्ट्रवादीचे सर्व आमदार सध्या रेनेसॉं हॉटेलमध्ये आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सुरक्षेच्या कारणास्तव रेनेसॉं हॉटेलमधील मुक्काम हलवा, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता हे सर्व आमदार हयात हॉटेलमध्ये राहणार आहेत, असे समजते . 


शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून आमदार फुटू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी बाळगली जात आहे. यासाठी तिन्ही पक्षांकडून आमदारांना एकत्रित हॉटेलमध्ये ठेवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये ठेवले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांना ललित हॉटेलच्या शेजारी असलेल्या 'द लेमन ट्री' या हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे, तर कॉंग्रेसचे सर्व आमदार जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

भाजपने राष्ट्रवादीच्या चार आमदारांना डांबून ठेवले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपने डांबून ठेवलेल्या आमदारांच्या आम्ही सातत्याने संपर्कात आहोत, ते लवकरच परत येतील असा आमचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे 50 आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

सत्तानाट्याच्या अंकात घोडेबाजाराला पेव फुटण्याची शक्‍यता असल्याने शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपापल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com