NCP Mla Saroj Ahire Giving Food to Needy and Sprying Disinfectants
NCP Mla Saroj Ahire Giving Food to Needy and Sprying Disinfectants

आमदार सरोज अहिरेंनी घरोघर जाऊन १८ टन धान्य वाटले!

कोरोना' संकटाशी सामना करण्यासाठी नागरीकांनी घरीच थांबावे, असे आवाहन आमदार सरोज अहिरे करीत आहेत. लॉकडाऊनच्या अडचणीमुळे घरातच अडकलेल्या या नागरीकांना गेल्या सहा दिवसांत घरोघर जाऊन अठरा टन धान्याचे वाटप त्यांनी केले आहे

नाशिक : "कोरोना' संकटाशी सामना करण्यासाठी नागरीकांनी घरीच थांबावे, असे आवाहन आमदार सरोज अहिरे करीत आहेत. लॉकडाऊनच्या अडचणीमुळे घरातच अडकलेल्या या नागरीकांना गेल्या सहा दिवसांत घरोघर जाऊन अठरा टन धान्याचे वाटप त्यांनी केले आहे. देवळाली मतदारसंघातील विविध गावांतील नागरीकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने राबविलेला हा उपक्रम त्यामुळेच चर्चेत आहे.

नाशिकमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्याची सर्वाधीक झळ ग्रामीण बागात शेतमजूर तसेच रोजंदारी करणाऱ्या मजुरांना बसली. लॉकडाऊन होऊन आठ ते दहा दिवस झाल्याने त्यांना भाजीपाला, अन्नधान्य तसेच जीवनाश्‍यक वस्तूंसाठी त्यांना खरेदी करण्याचीही क्षमता राहिली नाही अन्‌ ठरवले तरी दुकाने बंद असल्याने खरेदीही करता येत नाही अशी स्थिती आहे. नाशिक शहरालगतच्या या गावांतील नागीरकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तू वाटपासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अहिरे यांनी देवळाली मतदारसंघतील विविध भागात जाऊन पुढाकार घेतला. परिसरातील नागीरकांनी यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. विविध परिचीतांनी त्यांना धान्य जमा करण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे सहा दिवसांत त्यांनी विविध बागातील नागरीकांप्रयंत मदत पोहोचवली.

या कालावधीत संचारबंदीमुळे झालेल्या बॅरिकेडींगमुळे बंद झालेले रस्ते, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी, नागरिकांनी केलेल्या रेशनची दुकाने बंद असल्याच्या तक्रारी या आमदार तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे आल्या होत्या. अनेकांनी याबाबद दूरध्वनी करुन मदत मागीतली होती. अनेकांच्या घरी चुल पेटण्याचीही भ्रांत होती. त्यामुळे देवळाली मतदारसंघातील विविध भागात जाऊन या गरजू नागरीकांना घरपोच गहू, तांदूळ तसेच अन्य जीवनाश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे, विक्रम कोठुळे, सोमनाथ बोराडे, संतोष अहिरे, श्रीकांत मगर, विकास पाटील, शुभम कर्डीले, समाधान पवार, गणेश शिरसाठ, शशी थेटे आदी त्यात सहभागी झाले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com