NCP MLA Sangram Jagtap Flag politics | Sarkarnama

अनिल राठोडांच्या गडासमोरच आमदार जगताप यांनी भगवा झेंडा हाती घेतला !

मुरलीधर कराळे
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नगर :  विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या चितळेरोडवरील कार्यालयाजवळ गणेश विसर्जन मिरवणुक पोहोचली आणि उपस्थितांना वेगळे दृश्य पाहवयास मिळाले .  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भगवा पंचा गळ्यात टाकून भगवा झेंडा हाती घेतला  .

नगर :  विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या चितळेरोडवरील कार्यालयाजवळ गणेश विसर्जन मिरवणुक पोहोचली आणि उपस्थितांना वेगळे दृश्य पाहवयास मिळाले .  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भगवा पंचा गळ्यात टाकून भगवा झेंडा हाती घेतला  .

आता आमदार संग्राम जगताप यांनी भगवा झेंडा फक्त श्री विसर्जन मिरवणुकीपुरता हाती घेतला की कामाचा हाती घेऊन ते  शिवसेनेत जाणार का अशी चर्चा  लोकात सुरु झाली .

आमदार जगताप शिवसेनेत गेल्यास ते विधानसभेची उमेदवारी घेतीलअर्थातच राठोड यांना उमेदवारी मिळू शकणार नाहीत्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राठोड यांच्या गोटात अस्वस्थता आहेजगताप यांनी शिवसेनेत येऊच नयेयासाठी राठोड यांचा गट देव पाण्यात ठेवून आहे

असे असताना आज गणेश विसर्जन मिरवणूक चितळेरोड येथे आली असता आमदार जगताप यांनी तेथे उपस्थित राहून हाती ढोल वाजविलातसेच गळ्यात भगवे उपरणे टाकून भगवा झेंडा नाचविलाचितळेरोडवर राठोड यांचे कार्यालय आहेया कार्यालयाजवळच हा घडलेला प्रसंग कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून साजरा केला.

राठोड यांच्यापुढे दुहेरी संकट

भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये नगरची जागा शिवसेनेला असतेतथापिती भाजपला मिळावीयासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी वरिष्ठ पातळीवर जोरदार मागणी केली आहेउद्या मुख्यमंत्री नगरला आल्यानंतर याबाबतचे निवेदन पुन्हा देण्यात येणार आहेही जागा लढविण्यास गांधी उत्सुक असूनती भाजपला मिळाल्यास ते दावेदार होतीलअर्थात जागा बदलल्यास विधानसभेतून राठोड यांचा पत्ता कट होणार आहे.

हे मोठे संकट घोंगावत असताना ही जागा शिवसेनेलाच राहिल्यास राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहेते पक्ष बदलतील म्हणजेच उमेदवारी घेऊनच शिवसेनेत प्रवेश करतील

त्यामुळे शिवसेनेला जागा राहिली तरी अडचण होणार आहेत्यामुळे राठोड यांच्यापुढे दुहेरी संकट उभे राहिले आहेअसे वातावरण असताना जगताप यांनी राठोड यांच्याच कार्यालयाजवळ भगवा नाचविल्याने आणि भगवा पंचा गळ्यात घालून मिरवणुकीत सहभाग घेतल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख