NCP MLA Rohit Pawar Give Advice to Ashish Shelar | Sarkarnama

आत्ता तरी सुधरा राव...रोहित पवारांचा आशिष शेलारांना सल्ला!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 मार्च 2020

राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले 'बुरे दिन" हे अशाच अहंकाराचं फळ आहे. आत्ता तरी सुधरा राव असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना दिला आहे

पुणे : भारतीय जनता पक्षाचे सुरवातील दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तुमच्या पक्षासाठी आलेले 'अच्छे दिन" हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले 'बुरे दिन" हे अशाच अहंकाराचं फळ आहे. आत्ता तरी सुधरा राव, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आशिष शेलार यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. तसे ट्वीट त्यांनी केले आहे

मुंबई : राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५०  जिंकू...आहेत त्या आठ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, असे म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिशन २०२२ ची खिल्ली उडवली. त्याला रोहित पवार यांनी तातडीने उत्तर दिले.

संबंधित लेख