आमदार राजेश टोपे यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार 

अंबड व घनसावंगी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी महाराष्ट्र विधानसभेतील कामकाजा दरम्यान विविध प्रश्नांवर उत्कृष्ट भाषण करुन प्रश्न मांडून सभाग्रहासमोर सत्य परिस्थिती पुराव्यानिशी सादर केल्याने त्यांना विधानसभेतील उत्कृष्ठ भाषण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे
आमदार राजेश टोपे यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार 

वडीगोद्री (जि. जालना) : अंबड व घनसावंगी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी महाराष्ट्र विधानसभेतील कामकाजा दरम्यान विविध प्रश्नांवर उत्कृष्ट भाषण करुन प्रश्न मांडून सभाग्रहासमोर सत्य परिस्थिती पुराव्यानिशी सादर केल्याने त्यांना विधानसभेतील उत्कृष्ठ भाषण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे

आमदार राजेश टोपे यांची सन 2015 ते सन2018 या कालावधीत उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे संसदीय प्रधान सचिव आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सचिव अनंत कळसे, जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या समितीने हा पुरस्कार जाहीर केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com