नैसर्गिक आपत्तीत धावणाऱ्या युवकांच्या पाठीवर आमदार दिलीप बनकरांची थाप!

चांदोरी येथील युवकांनी एकत्र येऊन शोध व बचाव पथक स्थापन केले. त्या माध्यमातून महापूर, अपघात किंवा कुठलीही दुर्घटना असो मदती साठी हे पथक सदैव तत्पर असते. या पथकाचे कौतुक आमदार दिलीप बनकर यांनी केले
NCP MLA Dilip Bankar Appreciated Work of Relief Workers
NCP MLA Dilip Bankar Appreciated Work of Relief Workers

चांदोरी : नेमेची येतो पावसाळा..अन्‌ त्यानंतर पाण्यात बुडते चांदोरी हे समीकरण ठरलेले. पावसाळ्यात गोदावरीला पुर आला नाही अन्‌ चांदोरी- सायखेडा या गावांत पाणी शिरले नाही असे क्वचितच होते. त्याचा परिणाम म्हणून येथील अनेक युवक या काळात मदतकार्यासाठी पुढाकार घेतात. असेच येथील तीस युवकांनी एकत्र येत पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी या पथकाला लाईफ जॅकेट व अन्य साहित्य दिले आहे. त्यामुळे हे युवक भविष्यात अधिक सक्षमपणे काम करु शकतील.

गोदावरी नदीचा उगम नाशिकला होतो. मात्र त्या पाण्याचे नगर, मराठवाडा ते थेट आंध्र प्रदेशच्या राजमेहेंद्रीला गोदावरी समुद्राला मिळेपर्यंतच्या पाण्यावर देखरेख, निरीक्षण, नियंत्रणाचे काम चांदीर जवळच्या नांदूर मधमेश्‍वर बंधाऱ्यातून होते. गेले काही दिवस या बंधाऱ्यात गाळाचे प्रमाण वाढल्याने पूर आला की चांदोरी व सायखेडा या गावांत हमखास पाणी शिरतो. यावेळी गावे रिकामी करावी लागतात. नागरीकांना सुरक्षीत स्थली हलवावे लागते. त्यासाठी बाहेरच्या यंत्रणेवर अवलंबून रहावे लागते. 

त्याला पर्याय म्हणून चांदोरी येथील युवकांनी एकत्र येऊन शोध व बचाव पथक स्थापन केले. त्या माध्यमातून महापूर, अपघात किंवा कुठलीही दुर्घटना असो मदती साठी हे पथक सदैव तत्पर असते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात या पथकाने आपल्या जिवाची पर्वा न करता अनेकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. चांदोरीसह परिसरात एखादी आपत्ती उद्भवल्यास या पथकातील युवक मदतीसाठी तातडीने धाव घेते. प्रशासनाकडून कुठलीही अपेक्षा नकरता त्यांचे काम सुरु असते. 

त्यांच्या या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी त्यांना पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लाईफ जॅकेट, गणवेश, बूट उपलब्ध केले. एरव्हीही ते त्यांच्या नियमीत संपर्कात राहून त्यांना प्रोत्साहन देत असतात. रविवारी सायखेडा येथे झालेल्या कार्यक्रमात त्याचे वितरण झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com