माझ्या व्यथा मी अजितदादांना सांगितल्या होत्या : अवधूत तटकरे

माझ्या व्यथा मी अजितदादांना सांगितल्या होत्या : अवधूत तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज हाती 'शिवबंधन' बांधलं.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. मला राजकीय महत्त्वाकांक्षा आहे मात्र पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचे अवधूत तटकरे यांनी स्पष्ट केले.

गेली काही दिवसांपासून कार्यकर्त्याशी पक्ष बदला बाबत आपली चर्चा सुरू होती. याबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी एकदा चर्चा ही केली होती. यावेळी माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या. मात्र अजित पवार यांनी काही सांगण्याचा आधीच आपण पक्ष बदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो असं अवधूत तटकरे यांनी स्पष्ट केलं.

``मी कोणावरही नाराज नाही. मला राजकीय महत्वकांक्षा काहीशी आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी शिवसेनेत आलेलो नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पडणार असून श्रीवर्धनमध्ये शिवसेने विरोधात जो उमेदवार उभा राहील त्याला कडवी झुंज देणार असल्याचे सांगत यासर्व प्रकाराबाबत आपले काका सुनील तटकरे यांच्याशी काहीही बोलणे झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com