सचिन दोडके, सुनील टिंगरे आणि चेतन तुपे : राष्ट्रवादीचे फ्रेश चेहरे आघाडीवर

सचिन दोडके, सुनील टिंगरे आणि चेतन तुपे : राष्ट्रवादीचे फ्रेश चेहरे आघाडीवर

पुणे : पुणे शहरातील आठपैकी तीन मतदारसंघात आघाडीने भाजपवर मात केली आहे. त्यात खडकवासला या भाजपच्या बालेकिल्लात राष्ट्रवादीचे सचिन दोडके 5821 मतांनी आघाडीवर आहेत. शिवाजीनगरमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे पुन्हा आघाडीवर गेले आहेत. कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील हे 11 हजार मतांनी लीडवर आहेत.

खडकवासल्यातील आठव्या फेरीअखेर भीमराव तापकीर (भाजप) : 37957,सचिन दोडके ( राष्ट्रवादी ) : 43778 अशी मते मिळाले. दोडके यांनी ५८२१ मतांची आघाडी आहे. संजय जगताप हे पुरंदरमधून 7849 मतांनी आघाडीवर राहून विजय शिवतारेंची डोकेदुखी वाढली आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात शरद सोनावणे १२१०७,  अतुल बेनके १५९१६ आणि आशाताई बूचके १०५२० अशी मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अतुल बेनके ३८०९  मतांनी आघाडीवर आहेत. संग्राम थोपटे हे यांची 49 मतांची आघाडी केवळ उरली आहे. खेड मतदारसंघात दिलीप मोहिते दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिरूरमध्ये सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे अशोक पवार पावणे तीन हजारांनी पुढे आहेत. हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com