ncp maval candidate suspense continue | Sarkarnama

पार्थ पवारांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही : शरद पवार

उत्तम कुटे
बुधवार, 13 मार्च 2019

पिंपरी : मावळातीलच नव्हे, राज्यातील कुठलाही राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप जाहीर केला नसल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पिंपरी -चिंचवडमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे मावळातून जोरदार तयारीत असलेल्या पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायमच राहिला नसून उलट तो आणखी वाढला आहे. 

माढा येथून आपली उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा शरद पवार यांनी नुकतीच पुण्यात केली होती. यावेळी मावळातून पार्थ यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केल्याने मावळमधील पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा संभम्रात पडले आहेत.

पिंपरी- चिंचवडला एका मंगल कार्यालयात जमलेल्या मावळमधील बूथप्रमुख आणि पदाधिकारी यांच्याशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आज संवाद साधला. त्यावेळी पक्षाचे लोणावळ्याचे माजी अध्यक्ष राजीव बोर्हाडे यांनी पार्थला मावळची उमेदवारी दिल्या बद्दल आभार मानले. त्यावर पवार यांनी वरील स्पष्टीकरण दिले. तसेच  उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान मावळमध्ये पार्थ यांच्या गाठीभेटी सुरुच आहेत. आज ते घाटाखाली पनवेल येथे होते. नंतर लोणावळा येथील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन ते सुद्धा या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. 

दुसरीकडे आज पनवेलमध्येच अजित पवार यांनी पार्थ यांच्यासह इतरही आणखी काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी शेकापच्या मेळाव्यात बोलताना मावळमध्ये नवखा उमेदवार असेल, सांभाळून घ्या, असे आवाहन अजितदादांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख